शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

कोरोनाग्रस्त देशांतून ९ जण सांगलीत परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:19 IST

सांगली : कोरोनाबाधित देशांतून नऊ प्रवासी सांगली व मिरजेत परतले आहेत. त्यांच्यासंदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक ...

सांगली : कोरोनाबाधित देशांतून नऊ प्रवासी सांगली व मिरजेत परतले आहेत. त्यांच्यासंदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी महापालिकेला दिल्या आहेत. मिरजेत सात व सांगलीत दोघे प्रवासी परतले आहेत.जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आणि शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना केली आहे. त्यानुसार सांगलीत दोन व मिरजेत सात प्रवासी परतले आहेत. कोरोनाबाधित देशांत त्यांचा निवास होता. त्यांची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी जिल्हा आरोग्याधिकाºयांना दिली. हे सर्व रहिवासी महापालिका क्षेत्रातील असल्याने पुढील काळजी घेण्याची व कार्यवाहीची जबाबदारी महापालिका वैद्यकीय आरोग्याधिकाºयांवर सोपविण्यात आली. त्यांना १४ दिवस देखरेखीखाली ठेवावे व आवश्यकतेनुसार आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात ठेवावे, अशी सूचना केली आहे. आवश्यकतेनुसार सांगलीत शासकीय रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपचार द्यावेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे सांगितले आहे. त्याचा अहवाल दररोज राज्यस्तरावर पाठविण्यात येणार आहे.दरम्यान, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. संजय कवठेकर म्हणाले, बाहेरील देशांतून आलेल्या प्रवाशांची नोंद आम्ही घेतली आहे. या सर्वांना विमानतळावरच योग्य प्रतिबंधात्मक उपचार दिले आहेत. १४ दिवस वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल अरोग्याधिकाºयांना पाठविला आहे. नागरिकांच्या जागृतीसाठी पत्रके छापून वाटण्यात आली आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी प्रशासन घेत आहोत. सांगलीत कोठेही कोरोनासंदर्भात काळजीची परिस्थिती नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.सातजण मिरजेचे, दोघे सांगलीचेमिरजेत तासगाव वेस, किल्ला भाग, हायस्कूल रस्ता, कृष्णाघाट रस्ता, नदीवेस, पंढरपूर रस्ता तसेच सांगलीत शंभर फुटी परिसरात हे नऊजण राहण्यास अहेत. ते नुकतेच कोरोनाबाधित देशांतून परतल्याचे आरोग्याधिकाºयांनी पत्रात म्हटले आहे.