शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

जतला उन्हाच्या तडाख्याने जनावरांचे हाल

By admin | Updated: May 31, 2017 00:18 IST

जतला उन्हाच्या तडाख्याने जनावरांचे हाल

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यात उन्हाच्या वाढत्या कडाक्याने दुभती जनावरे धापा टाकू लागली आहेत. उष्माक्षयाच्या झटक्याने दुभत्या म्हैशी, गाय जायबंदी होत आहेत, तर नवजात रेडके अशक्त जन्माला येऊ लागली आहेत. दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. जिवापाड जतन केलेल्या गाभण म्हैशींचे वाढत्या तापमानाने होणारे हाल पाहून पशुमालक धास्तावल्याचे चित्र आहे. पाणी टंचाई आणि चारा टंचाईने दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे. शेळ्या-मेंढ्यांवरही उन्हाचा परिणाम होत आहे.तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र १ लाख ५२ हजार ७८० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र २३ हजार ३८० हेक्टर आहे. एकूण बागायत क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर, तर जिरायत क्षेत्र ६२ हजार २९९ हेक्टर आहे.खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी हा तालुका प्रसिध्द आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशचे वैभव आहे. जातिवंत देखणी, चपळ, काटक, चिवट आणि रोगप्रतिकारक असणारी खिलार जनावरे प्रसिध्द आहेत. तालुक्यात गाई-बैल ८८ हजार ९०५, म्हैशी ६२, १३१, शेळ्या १ लाख ३० हजार ३९५, मेंढ्या ७७ हजार ९७६, कोंबड्या २ लाख ५१ हजार १९० अशी एकूण ६ लाख १० हजार ६०५ जनावरे आहेत. पूर्वी कोरडवाहू जमीन, डोंगराळ भाग, पडीक जमिनीचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांचे पालन करणे सुलभ होते. सध्या तालुक्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग तीन वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. ५५ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई आणि चारा टंचाईने शेतकऱ्यांना दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे. चारादेखील महाग झाला आहे.साऱ्यात भर पडली आहे ती वाढत्या तापमानाची..! गेल्या महिन्यापासून तालुक्यात सातत्याने ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहिले आहे. वाढत्या तापमानाचा झटका दुभत्या म्हैशी, गाई या जनावरांना जीवघेणा ठरू लागला आहे. तापमान वाढीने अनेक दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. तापमान वाढीने अनेक दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. गावातील दूध संकलन केंद्रातील दूध घटले आहे. त्यामुळे गावात रतीब घालणाऱ्या गवळ्यांची संख्या कमी झाली आहे. दूध डेअरीतून ग्राहकांना ४0 ते ४५ रूपये लिटरने दुधाची विक्री केली जात आहे. पुणे, मुंबईतील दराच्या बरोबरीने दूध विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.गर्भपाताचे मोठे संकटवाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढ्या या लहान जनावरांवर गर्भपाताचे महासंकट उभे राहिले आहे. दिवस न भरताच शेळ्या, मेंढ्यांचा गर्भपात होत आहे. तसेच माजावर न येणे याही घटना घडू लागल्याने, वांझ प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे या घटना होत असताना, पशुसंवर्धन विभाग मात्र, जणू आपण त्या गावचे नसल्यासारखा डोळ्यावर झापड ओढून निवांत आहे. असे दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी पशुपालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, गाभण जनावरांचा वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत किमान गावपातळीवर तरी पशुपालकांच्या प्रबोधनाची मोहीम राबविणे गरजेचे आहे. याकडे पशुसंवर्धन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांत जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.