शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तांदळाची आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी, विक्रमी निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:03 IST

Rice Food Sangli- भारतीय तांदूळ उत्पादक, निर्यातदारांची कोरोनाच्या संकटकाळातही चांदी झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ टक्के, तर बिगर बासमती तांदळाची १२२.६१ टक्के निर्यात वाढ नोंदली गेली आहे. येत्या दोन महिन्यात आणखी उच्चांकी वाढ होण्याचा अंदाज ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना वर्तविला आहे.

ठळक मुद्देभारतीय तांदळाची आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी, विक्रमी निर्यात बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत १२२ टक्के वाढ

अविनाश कोळीसांगली : भारतीय तांदूळ उत्पादक, निर्यातदारांची कोरोनाच्या संकटकाळातही चांदी झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ टक्के, तर बिगर बासमती तांदळाची १२२.६१ टक्के निर्यात वाढ नोंदली गेली आहे. येत्या दोन महिन्यात आणखी उच्चांकी वाढ होण्याचा अंदाज ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना वर्तविला आहे.भारतातून मोठ्या प्रमाणावर दरवर्षी बासमती व बिगर बासमती तांदळाची निर्यात होत असते. बासमती तांदळापैकी ८० टक्के माल मध्य-पूर्व देशात म्हणजेच अरब राष्ट्रांमध्ये जात असतो. यातील अनेक देशांनी कोविड कायम राहण्याच्या भीतीने मागणीपेक्षा जास्त तांदळाची साठवणूक सुरू केली आहे. त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर ३.८ मिलियन टन (३३,८०,६५४ टन) झाली आहे. मार्चअखेर ती ४.५ मिलियन टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे कार्यकारी संचालक विनोद कौल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, बासमतीपेक्षा बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत यंदा उच्चांक नोंदला जाणार आहे. २०१९-२० मध्ये ५ मिलियन टन तांदूळ निर्यात झाला होता. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२१ पर्यंत ९.६ मिलियन टन तांदळाची निर्यात झाली आहे. मार्चअखेर ही निर्यात १४ मिलियनपर्यंत जाऊ शकते.थायलंड, व्हिएतनाम व पाकिस्तान या तांदूळ निर्यातदार व स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय बिगर बासमती तांदळाचा दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १०० डॉलरने कमी आहे. भारतातील ७० टक्के माल अफ्रिकन देशात जातो. ज्याठिकाणी दरांची मोठी स्पर्धा असते. त्यामुळे भारतीय तांदळाला मागणी अधिक आहे.निर्यात वाढत असताना देशांतर्गत बाजारात बिगर बासमती तांदळाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. येत्या काही महिन्यात हे दर चढेच राहणार आहेत. इंधन दरवाढीचाही त्यावर परिणाम आहे.विनोद कौल यांनी सांगितले की, देशात यंदा तांदळाचे उत्पादन चांगले झाले आहे. गेल्या काही वर्षातील निर्यातीचा उच्चांक यंदा नोंदला जाईल. पुढील आर्थिक वर्षातही तांदळाच्या निर्यातीला अत्यंत चांगले वातावरण राहील. 

टॅग्स :foodअन्नSangliसांगली