सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या सभागृहात आज दुपारी तीन वाजता प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आ. मोहनराव कदम, आ. विक्रम सावंत, विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, शिवाजी विद्यापीठ, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक बांधीलकी जोपासणारा एक सेवाधर्मी शिक्षक अशी प्रतिमा समाजात निर्माण करणारे प्रा. श्रीकृष्ण मोहिते हे आपल्या तीन दशकांहून शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळेच त्यांचा सत्कार महाविद्यालय व विविध सामाजिक संस्था, पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्यावतीने होणार आहे.
फोटो-०४श्रीकृष्ण मोहिते