शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात खासदार दाखवा अन्..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:18 IST

लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने प्रचारासाठी वाळवा आणि शिराळा तालुक्यांत आले, मात्र विजय मिळवल्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे ह्यखासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवाह्ण असे बोलले जात आहे. वाळवा-शिराळा तालुक्यांत चार अपवाद वगळता खासदारांची नेहमीच आयात करावी लागली आहे.

ठळक मुद्देवाळवा-शिराळ्यात खासदार दाखवा अन्..!विजय मिळवल्यानंतर दोन्ही तालुक्यांचा विसर

अशोक पाटील इस्लामपूर : लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने प्रचारासाठी वाळवा आणि शिराळा तालुक्यांत आले, मात्र विजय मिळवल्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा असे बोलले जात आहे.वाळवा-शिराळा तालुक्यांत चार अपवाद वगळता खासदारांची नेहमीच आयात करावी लागली आहे.

वाळवा-शिराळा कऱ्हाड लोकसभा मतदार संघात असताना आनंदराव चव्हाण, प्रमिलाकाकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांना निवडून देण्यात आले होते. हे तालुके हातकणंगले मतदार संघात गेल्यानंतर निवेदिता माने, राजू शेट्टी यांनी प्रतिनिधीत्व केले.

२0१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण, हा प्रश्न भाजप-शिवसेना युतीपुढे होता. अंतिम टप्प्यात हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले धैर्यशील माने यांना शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली.माने यांच्यारुपाने तरुण आणि नवीन चेहरा मतदारसंघाला मिळाला, यामुळेच तरुण वर्गाने हिरीरीने मतदान करुन निवडून दिले. परंतु माने निवडणुकीच्या प्रचारासाठी आले तेवढेच. त्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा जणू विसरच पडला आहे. त्यामुळे येथे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा, असेच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे. 

टॅग्स :shirala-acशिराळाSangliसांगली