शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत शिवसेनाच सक्षम पर्याय : नितीन बानुगडे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 15:19 IST

सांगली महापालिकेच्या सत्तेचा उपभोग घेतलेले कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष आणि त्यांचे नगरसेवक बदनाम झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुुंबई आणि ठाण्याचा मोठा अनुभव पाठीशी असलेली शिवसेनाच लोकांसमोर चांगला पर्याय ठरेल, असे मत संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देसांगलीत नगरसेवक शेखर माने यांचा पक्षप्रवेशाबद्दल सत्कार शिवसेना व माझे विचार सारखेच : शेखर माने शिवसेनेत गटबाजीला थारा नाही : बानुगडे

सांगली , दि. १९ :  महापालिकेच्या सत्तेचा उपभोग घेतलेले कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष आणि त्यांचे नगरसेवक बदनाम झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुुंबई आणि ठाण्याचा मोठा अनुभव पाठीशी असलेली शिवसेनाच लोकांसमोर चांगला पर्याय ठरेल, असे मत संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सांगलीत त्यांच्याहस्ते नगरसेवक शेखर माने यांचा पक्षप्रवेशाबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार आहे. माजी आमदार संभाजी पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, पृथ्वीराज पवार, नुकतेच प्रवेश केलेले नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका निवडणूक लढवली जाईल.

सांगली मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. पाणी योजना, ड्रेनेज यासह आरोग्याचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. एकही रस्ता धड नाही, खड्ड्यांचे साम्राज्य आहे. महापालिका स्थापनेला २० वर्षे होऊनही मूलभूत सुविधा पुरवू शकत नाही.

साडेसहाशे कोटींचे बजेट मांडणाऱ्या भ्रष्ट महापालिकेला विकासकामांसाठी खर्चाला पैसे नाहीत, ही गोष्टच न पटणारी आहे. दूषित पाणी, रस्ते, कचरा उठाव याबाबत कारभारी उदासीन आहेत. घरकुल योजनेतील घरकुले निकृष्ट आहेत. कराचा पैसा देऊनही त्याचा मोबदला मिळत नसेल, तर नागरिकांना निश्चितच वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. सर्व पक्ष अपयशी ठरलेत. आता शिवसेना महापालिका निवडणुकीत सक्षम पर्याय देणार आहे.

शिवसेनेत गटबाजीला थारा नाहीशिवसेनेत गटबाजीला थारा नाही. पक्षाचा आदेश आला की तो मानावाच लागतो. काही मतभेद असले तरी वरिष्ठांकडे मांडून दूर करता येतात. माजी आमदार संभाजी पवार, पृथ्वीराज पवार हे शिवसेनेतच आहेत. यापुढे एकदिलाने शिवसेना प्रत्येक तालुक्यात पक्षाची बांधणी करणार आहे, असे बानुगडे म्हणाले.

सेना व माझे विचार सारखेचशेखर माने म्हणाले की, सत्तेत असूनही भ्रष्ट कारभाराविरोधात लढण्याची भूमिका आम्ही महापालिकेत स्वीकारली. त्यासाठी आक्रमकताही अंगिकारली. तशीच भूमिका घेऊन शिवसेनाही राज्याच्या सत्तेत असूनही लढत आहे. भूमिकांमधील साम्य असलेला हाच धागा मला या पक्षाकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरला. पद किंवा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता प्रवेश केला आहे. शिवसेनेनेही मला पूर्वीप्रमाणेच काम करण्याची मोकळीक दिली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाPoliticsराजकारण