ठाणे महापालिका साकारणार पीपीपीच्या माध्यमातून कोलशेत भागात स्नो वर्ल्ड पार्क

By अजित मांडके | Published: October 17, 2017 12:00 AM2017-10-17T00:00:00+5:302017-10-17T00:00:00+5:30

बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला मग आता काश्मिरला जाण्याची गरज नाही. भविष्यात ठाणेकरांना या बर्फाच्या खेळाचा आनंद ठाण्यातच घेता यावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

SnowWorld Park in Kolshit area through PPP to form Thane Municipal Corporation | ठाणे महापालिका साकारणार पीपीपीच्या माध्यमातून कोलशेत भागात स्नो वर्ल्ड पार्क

ठाणे महापालिका साकारणार पीपीपीच्या माध्यमातून कोलशेत भागात स्नो वर्ल्ड पार्क

googlenewsNext
ठळक मुद्देपीपीपीच्या माध्यमातून साकारला जाणार प्रकल्पप्ले झोन, सायन्स एज्युकेशन झोन आणि एक्स्पो झोनची सुविधा उपलब्ध३० वर्षांसाठी खाजगी ठेकेदाराच्या ताब्यात निगा आणि देखभालघोडंबदर, कोलशेत भागात आकार घेणार स्नो वर्ल्डपर्यावरणाभिमुख तंत्रज्ञानाचा केला जाणार अवलंब

ठाणे - आयुष्यात प्रत्येकालाच आपल्या देशातील स्वर्ग म्हणजेच काश्मीरला जाण्याचा इच्छा असते. परंतु प्रत्येकालाच या स्वर्गाचा अनुभव मिळतोच असे नाही. पण ठाणे महापालिकेने ठाणेकरांसाठी तोच बर्फाच्छादीत ठिकाणाचा आंनद देण्याचा विचार केला आहे. त्यानुसार, या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. पीपीपी तत्वावर हे पार्क विकसित केले जाणार असून येथे प्ले झोन, सायन्स एज्युकेशन झोन, एक्स्पो झोन आदींसह इतर खेळांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
सध्या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मंजुर विकास आराखड्यातील पार्क आरक्षणे विकसित करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये, प्रामुख्याने सेंट्रल पार्क, कम्युनिटी पार्क, सदर्न, नर्दन, फाऊंटन, जिम्नेस्ट पार्क आदींसह इतर पार्क विकसित केले जात आहेत. आता यामध्ये आणखी एक पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आरक्षण क्रमांक ५ या भुखंडावरील सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर हे पार्क विकसित केले जाणार आहे. कोलशेत ब्रम्हांड येथील आरक्षित भुखंडावर हे पार्क साकार होणार असून पीपीपीच्या माध्यमातून या पार्कचा विकास केला जाणार आहे.

  • प्ले झोन - साबझिरो झोन विकसित केला जाणार असून (-५ डीग्री) असून सर्वानसाठी बर्फाशी, संबधींत प्रकारच्या मनोरंजक सुविधा, खेळ यांचा समावेश असणार आहे. विशेषत: हिमालय किंवा अल्प पर्वतावर जमा नैसर्गिक बर्फ पडल्याचा आनंदासारखा क्षणा याठिकाणी स्नो फॉल दरम्यान अनुभवता येणार आहे. यामध्ये कृत्रिम सिल्स, पोलर बिअर्स, पेग्विन, अल्पाईन ट्रीज आदींचा समावेश असणार आहे. त्यातही स्नो प्ले एरियामध्ये स्लाईड्स, स्नो मेरी गो राऊंड, स्नो माऊंटन क्लायंथिंग, स्क्ल्पचर्स, अलपाईन हिल्स, आईस स्कल्पचर्स, स्नो - डांसिग फ्लोअर आदीं सुविधांचा समावेश असणार आहे.
  • सायन्स - एज्युकेशन झोन - या भागात प्रत्येक व्यक्तीला विशेषत: विद्यार्थी, लहान मुले व तरुणांना फ्रोजन वर्ल्ड पोलर रिजन्सया इकी सिस्टिमचा पर्यावरणीय परिस्थिी व राहणीमान पध्दतीसह मनोरंजनाच्या माध्यमातून अभ्यास करता येणार आहे. आर्कटिक व अ‍ॅटार्क्टिक असलेल्या बर्फीय क्षेत्राचे मनोरंजनाच्या माध्यमातून अभ्यास करता येणार आहे.
  • एक्स्पो झोन - या भागात विविध संस्था, आयोजक व इंव्हेट मॅनेजर्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवासायिकांना त्यांचे विविध कार्यक्रम व प्रदर्शन सादर करता येणार आहेत. आदींसह इतर महत्वाच्या सुविधा देखील उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे ६० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जॉईन्ट व्हेंचरच्या माध्यमातून पीपीपी तत्वावर हे पार्क विकसित केले जाणार आहे.

त्यातही हे पार्क पर्यावरणभिमुख तंत्रज्ञानाचा अवलंब करुन साकारले जाणार आहे. यामध्ये स्नो पार्कचे बांधकाम हे ग्रिन बिल्डींग पध्दतीने करण्यात येणार आहे. परिसरात अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर केला जाणार आहे. वर्षा जलसिंचन प्रकल्प, व्हर्मि कंपोस्टिंग व घनकचरा विघटन आदींचा अंतर्भाव केला जाणार आहे. हे पार्क संबधींत ठेकेदाराला ३० वर्षांसाठी चालविण्यासाठी दिले जाणार असून या पार्कच्या निगा, देखभालीची जबाबदारी ही त्याचीच असणार आहे.

Web Title: SnowWorld Park in Kolshit area through PPP to form Thane Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.