शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अणुऊर्जा विकासासाठी एकत्रित प्रयत्न हवा : शिवराम भोजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:06 IST

हजारो वर्षे पुरणारी अणुऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येला तिची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे अणुप्रकल्पांंविषयीचे गैरसमज सोडून अणुसंशोधन व्हायला हवे. त्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअणुऊर्जा विकासासाठी एकत्रित प्रयत्न हवा : शिवराम भोजेप्राचार्य डॉ. पी. बी. पाटील जयंतीनिमित्त सोशल फोरमच्यावतीने कर्मयोगी पुरस्कार

सांगली : हजारो वर्षे पुरणारी अणुऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येला तिची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे अणुप्रकल्पांंविषयीचे गैरसमज सोडून अणुसंशोधन व्हायला हवे. त्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी व्यक्त केले.प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील जयंतीनिमित्त सोशल फोरमच्यावतीने कर्मयोगी पुरस्काराने भोजे यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, घोेंगडी आणि पगडी देऊन भोजे यांचा सन्मान केला.डॉ. भोजे यांनी यावेळी भारतातील अणुसंशोधन व सयंत्राचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, सौरऊर्जेचा वापर वाढला तरी, अणुऊर्जेला पर्याय नाही. अमेरिकेने तिचा वापर विध्वंसासाठी केला. त्यानंतर रशियाने अणुसयंंत्र तयार केले.

भारतात जैतापूरमध्ये प्रकल्पाला विरोध झाला. २१ देशांत ४३८ अणुसयंत्रे आहेत. जपानमध्ये त्सुनामीमुळे अणुभट्टीचे नुकसान झाले, पण स्फोटात एकही माणूस दगावला नाही. विध्वंस होण्याच्या गैरसमजातून विरोध होत आहे.डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीचा वापर करणार नसाल, तर आजचा पुरस्कार अनाठायी ठरेल. त्यासाठी विज्ञानवादी होण्याची गरज आहे. संचालक गौतम पाटील यांनी स्वागत केले. माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, डॉ. भोजे यांनी अणुऊर्जा लोकहितासाठी वापरली. हा विज्ञानवादी विचार शांतिनिकेतनने कायम जपला आहे.यावेळी उमा भोजे व डॉ. भोजे यांच्या मातोश्री कोंडुबाई यांचाही सत्कार केला. तानाजीराव मोरे यांनी आभार मानले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे, शिवाजीराव पवार, माधवराव माने, सनतकुमार आरवाडे, वैभव नायकवडी, बी. आर. थोरात, डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. सपना भाटे, ब्रिगेडीयर सुरेश पाटील, श्रीनिवास डोईजड, डॉ. कुबेर मगदूम, एम. के. अंबोळे उपस्थित होते.

टॅग्स :scienceविज्ञानSangliसांगली