शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

शिवराम भोजे यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:55 IST

भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. डॉ. भोजे यांंनी भाभा अणुसंशोधन केंद्र प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ट्रॉम्बे येथील बीएआरसी येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून रूजू झाले. एक मेगावॅटच्या वेगवान-ब्रीडर टेस्ट अणुभट्टीच्या डिझाईन टीमचे सदस्य म्हणून फ्रान्समधील उशपींशी याठिकाणी ते एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर होते.

ठळक मुद्दे पी. बी. पाटील फोरमतर्फे सन्मान : सांगलीत १४ रोजी वितरण

सांगली : ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील फोरमच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रख्यात भारतीय अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १४ जानेवारी रोजी सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी दिली.

ते म्हणाले की, अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फोरमतर्फे दरवर्षी समाजपरिवर्तनाचे कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार डॉ. शिवराम भोजे यांना जाहीर झाला आहे. डॉ. शिवराम भोजे प्रख्यात भारतीय अणुशास्त्रज्ञ असून, त्यांनी डिझाईन, बांधकाम, आॅपरेशन, संशोधन आणि विकास या क्षेत्रात चाळीस वर्षे वेगवान-ब्रीडर अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य केले आहे. भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. डॉ. भोजे यांंनी भाभा अणुसंशोधन केंद्र प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ट्रॉम्बे येथील बीएआरसी येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून रूजू झाले. एक मेगावॅटच्या वेगवान-ब्रीडर टेस्ट अणुभट्टीच्या डिझाईन टीमचे सदस्य म्हणून फ्रान्समधील उशपींशी याठिकाणी ते एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर होते. त्यानंतर इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅॅटोमिक रिसर्चचे संचालक, एफबीटीआरचे अणुभट्टी अधीक्षक, तसेच अणुुऊर्जा विभागाच्या अनेक समित्यांचे सभासद व अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. भारतीय नाभीकिय विद्युत निगम लिमिटेडचे ते संस्थापक-संचालक होते. सेवानिवृत्तीनंतर ते कोल्हापूर येथे स्थायिक असून, शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी फोरमचे विश्वस्त व संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक तानाजीराव मोरे, प्रशासकीय अधिकारी एम. के. आंबोळे आदी उपस्थित होते.