शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भाजपच्या रेल्वेला शिवसेनेचा शेवटचा डबा : जयंत पाटील

By admin | Updated: March 22, 2015 00:23 IST

सरकारमध्ये शिवसेनेची परिस्थिती फार वाईट

विटा : सध्या राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार नसून फक्त भाजपचेच आहे. त्यांच्या रेल्वेला शिवसेनेचा शेवटचा डबा जोडला आहे. कारण भाजपला सेना सत्तेत नकोच आहे. त्यामुळे सध्या सरकारमध्ये शिवसेनेची परिस्थिती फार वाईट आहे, अशी टीका माजी ग्रामविकास मंत्री आ. जयंत पाटील यांनी केली. विटा येथे नगरपरिषदेने नव्याने बांधलेल्या सदाशिवराव (भाऊ) पाटील भाजी मंडई सुशोभिकरण व मच्छी मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी आ. पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, विनायकराव पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, नगरपालिकेचे पक्षप्रतोद वैभव पाटील, भारत पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरही त्यांना मदत देण्याबाबत केंद्र शासन उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा पंतप्रधानांना दुसऱ्या देशातील प्रश्नांची अधिक चिंता आहे. विटा शहरात इस्लामपूरपेक्षा जादा सुविधा आहेत. आम्ही आज सत्तेत नसलो तरी शहराच्या वाढीव घोगाव पाणी योजनेला निधी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. माजी आ. सदाशिवराव पाटील म्हणाले, गेल्या १० वर्षांत शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. परंतु, काही अपप्रवृत्तींनी लोकांमध्ये खोटा प्रचार करून चुकीचे संदेश दिले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. या कार्यक्रमास जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, गंगाधर लकडे, दत्तोपंत चोथे, नगरसेवक किरण तारळेकर, विशाल पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव, दहावीर शितोळे, प्रतिभा चोथे, लता मेटकरी, स्वाती भिंगारदेवे, विकास जाधव, अमित भोसले, शमशुद्दीन तांबोळी, रणजित कदम, अविनाश चोथे, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. आभार अविनाश चोथे यांनी मानले. (वार्ताहर)