शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीमध्ये चार ठिकाणी मिळणार शिवभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:45 IST

गरीब व गरजू लोकांसाठी दहा रुपयांमध्ये शिवभोजन देण्याच्या योजनेअंतर्गत सांगली शहरातील चार जागांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भोजनालये सुरू करण्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली जाणार आहे. सांगली शहरासाठी सुरुवातीला ४५० थाळी मंजूर करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसांगलीमध्ये चार ठिकाणी मिळणार शिवभोजनतालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती

सांगली : गरीब व गरजू लोकांसाठी दहा रुपयांमध्ये शिवभोजन देण्याच्या योजनेअंतर्गत सांगली शहरातील चार जागांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भोजनालये सुरू करण्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली जाणार आहे. सांगली शहरासाठी सुरुवातीला ४५० थाळी मंजूर करण्यात आल्या आहेत.शिवभोजन योजनेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ही योजना प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना इतर भागात राबवण्यात येईल. जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या सांगली शहरात ४५० थाळी मंजूर झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने गरीब व गरजू लोकांचा वावर असणाऱ्या परिसरांचा अभ्यास करून चार ठिकाणे निश्चित केली आहेत.यामध्ये सांगली मार्केट यार्ड, मध्यवर्ती बसस्थानक, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हिल) आणि कोल्हापूर रोडवरील विष्णुअण्णा पाटील फळमार्केट या जागांचा समावेश आहे. याठिकाणी मजूर, कष्टकरी व गरीब लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात. चारही ठिकाणी जिल्ह्यातून दररोज शेकडो नागरिक येत असतात. त्यामुळे शिवभोजन योजनेचा लाभ त्यांना याठिकाणी मिळू शकतो. ही भोजनालये दुपारी १२ ते २ या कालावधित सुरू राहतील.पुरवठा विभागाने शासनाकडे या चारही जागांचा प्रस्ताव पाठविला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात भोजनालय उभारणीबाबत पाऊल उचलले जाणार आहे. शिव भोजनालय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पुरेशी जागा असणे गरजेचे आहे.

योजना राबविण्यासाठी सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येणार आहे. याकरिता महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तर तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSangliसांगली