शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिरसगाव होतंय जलसमृद्ध गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:55 IST

प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेल्या शिरसगाव येथील भूजल स्रोत वाढविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी डोंगरउतारावर श्रमदानातून समतल चरी खोदल्या आहेत. वृक्षारोपण करीत येथे मानवनिर्मित अभयारण्य साकारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे शिरसगाव जलसमृद्ध गाव होत आहे. येथील प्रत्येक रहिवासी जलसंवर्धक होत आहे.शासनाने शिरसगावची जलयुक्त शिवार ...

प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेल्या शिरसगाव येथील भूजल स्रोत वाढविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी डोंगरउतारावर श्रमदानातून समतल चरी खोदल्या आहेत. वृक्षारोपण करीत येथे मानवनिर्मित अभयारण्य साकारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे शिरसगाव जलसमृद्ध गाव होत आहे. येथील प्रत्येक रहिवासी जलसंवर्धक होत आहे.शासनाने शिरसगावची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड केली आहे. जनतेच्या सहभागातून जलसंधारण व मृदसंधारण कामांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाणीपातळी उंचावण्यात यश येत आहे.यावर्षी झालेल्या पावसाने शिरसगावच्या डोंगरकुशीतील तलाव तुडुंब भरला आहे. यावर्षी येथे पडणाºया पावसाचा थेंब न् थेंब साठवला गेला आहे. तलाव, बंधारे, ओढापात्र, डोंगरउताराच्या सलग समतर चरी पूर्ण भरल्याचे दिसले. कडेगाव तालुक्यात ‘जलयुक्त’च्या माध्यमातून टंचाईमुक्त होण्याचा पहिला मान शिरसगाव मिळवत आहे.प्रत्येकाच्या खिशावर ‘जलसंवर्धक...’चा बिल्लायेथील प्रत्येकाच्या खिशावर ‘जलसंवर्धक शिरसगाव’ हे दोनच शब्द लिहिलेला बिल्ला लवकरच दिसेल. यामुळे प्रत्येकाला जलयुक्त शिवार मोहिमेतील जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याची प्रेरणा मिळेल, असे सरपंच सतीश ऊर्फ संभाजी मांडके यांनी सांगितले.पाणी पाहून भारावले शिरसगावकरग्रामस्थ व महाविद्यालयीन तरुणांनी श्रमदानातून खोदलेल्या समतल चरींमध्ये साठलेले पाणी पाहून शिरसगावकरांना अतीव आनंद झाला. आता उन्हाळ्यातही आमच्या विहिरींमध्ये पुरेसे पाणी असेल, असा विश्वास येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.