शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळे खुर्दच्या दोघांना खूनप्रकरणी जन्मठेप

By admin | Updated: February 16, 2017 23:19 IST

इंग्रुळच्या महिलेची निर्दाेष मुक्तता : ‘खून का बदला खून’ न्यायातून प्रकार

इस्लामपूर : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील खूनप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दोन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर सबळ पुराव्याअभावी एका महिलेची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. ‘खून का बदला खून’ या न्यायातून हा प्रकार घडला होता.आनंदा रामचंद्र पाटील (वय ४५, रा. शिराळे खुर्द, ता. शिराळा) व तानाजी ज्ञानदेव जाधव (३३, रा. पुनवत, ता. शिराळा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर जयश्री नीतेश ऊर्फ नथेश कुंभार (३९, रा. इंग्रुळ, ता. शिराळा) या महिलेची निर्दोष मुक्तता केली. वरील दोघा आरोपींनी दंडाची रक्कम न भरल्यास, त्यांना आणखी ३ महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.या खटल्याची पार्श्वभूमी अशी : जयश्री कुंभार हिचा पती नथेश विष्णू कुंभार याच्याविरुध्द २0१२ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये गणपती कुंभार महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांनी न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून जयश्री कुंभार हिने कट रचून गणपती कुंभार यांच्या खुनाची सुपारी आनंदा पाटील व तानाजी जाधव यांना दिली. या दोघांनी डिसेंबर १३ मध्ये गणपती कुंभार यांना सोबत घेऊन, ‘गुऱ्हाळाचे काम देतो’ असे सांगून उदगीरच्या जंगलात नेले होते व तेथे त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला होता. त्यांचा मृतदेह तेथेच जंगलात टाकण्यात आला होता.३ जानेवारी २०१४ रोजी हा खून उघडकीस आल्यानंतर, शिराळा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन वरील आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात सरकार पक्षातर्फे २० साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपास अधिकारी अनिल गुजर, बळीराम घुले यांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिर्यादीतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी या खटल्याचे काम पाहिले. (वार्ताहर)