शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्याच्या दोन भाऊंना आता सदाभाऊंचे आव्हान-जयंतरावांपुढेही ठोकला शड्डू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:02 IST

इस्लामपूर : राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यातून आ. नाईक यांचे विरोधक मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख या दोन भाऊंच्या पाठीशी

ठळक मुद्देकासेगावात कामांचा धडाका :

अशोक पाटील ।इस्लामपूर : राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यातून आ. नाईक यांचे विरोधक मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख या दोन भाऊंच्या पाठीशी जयंतरावांनी ताकद लावली आहे. आता आ. नाईक यांच्या साथीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले आहेत. या दोघांनी विकासकामांच्या उद्घाटनाचे औचित्य साधत जयंतरावांच्या कासेगावात धडक मारून शड्डू ठोकला आहे.

वाळवा तालुक्यातील कासेगाव व वाटेगाव ही शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावे महत्त्वाची मानली जातात. कासेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सरपंचांसह राष्ट्रवादीचे नऊ सदस्य, तर विरोधी शिवाजीराव नाईक गट, शिवसेना व काँग्रेस या सर्वांचे मिळून सहा सदस्य आहेत. कासेगाव येथे राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दनकाका पाटील, तर वाटेगावात पं. स. माजी सभापती रवींद्र बर्डे हे दोघे जयंतरावांच्या गटाचे नेतृत्व करतात; परंतु त्यांच्याच घरातील युवक नेते देवराज पाटील व राजेंद्र बर्डे यांच्यात अंतर्गत संघर्ष आहे. त्याचा फायदा भाजपाचे आ. नाईक यांना होत आहे. त्यातून गत विधानसभा निवडणुकीत या दोन्ही गावांत आ. नाईक यांनी बाजी मारली होती.

 

विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातील राजकीय समीकरणे रंग बदलणाºया सरड्याप्रमाणे बदलतात. आ. नाईक यांना शह देण्यासाठी राष्टÑवादीचे माजीआम. मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या दोन भाऊंनी पुन्हा एकत्र मोट बांधली आहे. या दोघांमागे जयंतरावांची ताकद आहे.आता मात्र या तिघांना शह देण्यासाठी आ. नाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सोबतीला घेऊन जयंतरावांचे गाव असलेल्या कासेगावात कोट्यवधींचा निधी आणला आहे. या विकासकामांचा प्रारंभ आणि उद्घाटन खोत यांच्या हस्ते ठेवून भाजपाचा फौजफाटा निमंत्रित केला आहे. यावेळी शक्तिप्रदर्शन करून दोन भाऊंना धक्का देण्याचा प्रयत्नआम. नाईक आणि सदाभाऊ खोत करणार आहेत. 

कासेगाव येथे झालेल्या विकासकामांसाठी राष्ट्रवादीनेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. भाजपाच्या उद्घाटन व शुभारंभ कार्यक्रमाबद्दल आपले काहीही मत नाही. कार्यक्रम झाल्यानंतर आपण सविस्तर बोलू.- देवराज पाटील, माजी अध्यक्ष जि. प. सांगली.