शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

शिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार? राजकीय समीकरणांविषयी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:02 IST

शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे

ठळक मुद्देमतदारसंघात उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू

अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन्ही नेत्यांनी आव्हान दिले आहे. त्यातच महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांचीही भर पडली आहे. येथील राजकीय समीकरणे बदलत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले. आता सर्वच पक्ष सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी उभे राहतील आणि उर्वरित सव्वा वर्षासाठी देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचाही तिढा सुटणार आहे.

सांगली जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम या नेत्यांनी काँग्रेस रुजवली. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी असा प्रवास करून इस्लामपूर मतदार संघाबरोबर जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम केली. पतंगराव कदम यांनीही ताकदीने काँग्रेस रुजवली. त्याचेच फलित म्हणजे आमदार मोहनराव कदम आणि आमदार विश्वजित कदम राजकीय पटलावर कार्यरत आहेत.

वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या वादाचे राजकारण आजही धुमसत आहे. याचा फायदा मोदी लाटेत भाजपला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना झाला आणि भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून वसंतदादा घराण्याला म्हणजेच काँग्रेसला धक्का बसला. विटा-खानापूर मतदार संघातही आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पेलून सदाशिव पाटील यांची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपला यशही मिळाले.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाताहत होत असतानाच, आर. आर. पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम यांच्यासारखे खंदे आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्ह्यात पोरकी झाली. या आघाडी काँग्रेसला उभारी येण्यासाठी राष्ट्रवादीतून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील, काँग्रेसमधून मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना राजकीय वारसदार ठरवताना कोणतेही अडसर निर्माण झाले नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तीन खंदे नेतृत्व हरपले असताना, डोंगरी भागाशी निगडित असलेल्या शिराळा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व आमदार शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला एकनिष्ठेने जपले. गेली १० वर्षे शरीर साथ देत नसतानाही डोंगरी भागाशी सततचा संपर्क आणि विकासाचा ध्यास ठेवत अखेरच्या श्वासापर्यंत शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसचा वसा जपला. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येऊन सत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेवर घेऊन डोंगरी भागातील नेतृत्व अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा सामान्यांतून उमटत आहे. त्यामुळे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीचा तिढाही आपसूकच सुटणार आहे.नवी राजकीय समीकरणेसत्यजित देशमुख यांना विधानपरिषद मिळाली, तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटेल. परंतु दुसरीकडे आमदार शिवाजीराव नाईक यांना शिराळा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात पेठनाक्यावरील महाडिक गटाचा सवतासुभा नवी राजकीय समीकरणे घडविण्याच्या इराद्याने संपर्क ठेवून आहे. त्यामुळे आमदार शिवाजीराव नाईक आणि महाडिक गटातील दुरावा कोणाच्या पथ्यावर पडणार, यावर शिराळा मतदारसंघात ऐन थंडीत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली