शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळकरांचे नागावरील प्रेम; विहिरीत पडलेल्या नागांना दिले जीवदान, दोरखंड बांधून काढले बाहेर

By श्रीनिवास नागे | Updated: April 19, 2023 16:24 IST

यापूर्वी अनेक जखमी नागांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत

शिराळा (जि. सांगली) : इटकरे (ता. वाळवा) व मांगले (ता. शिराळा) येथे दोन दिवसात विहिरीत पडलेल्या दोन नागांना शिराळकरांनी जीवदान देऊन नागावरील प्रेम दाखवून दिले.सोमवार, दि. १७ रोजी इटकरे येथील धीरज पाटील यांच्या पायऱ्या नसलेल्या २५ फूट खोल विहिरीत दोन नाग पडले होते. विहीर बांधीव नसल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. धीरज पाटील यांनी हे नाग पहिले व त्याची माहिती शिराळा येथील श्रीराम उर्फ बंटी नांगरे यांना दिली. यानंतर दिग्विजय शिंदे, श्रीनाथ गव्हाणे व श्रीराम नांगरे - पाटील तेथे गेले. दोरखंड बांधलेल्या झाडाच्या फांदीला नायलॉनचे पोते अडकवून हळूहळू विहिरीतील नागांजवळ जवळ सोडले. नाग या फांदीवर अथवा जाळीत अडकतो का याचे प्रयत्न सुरू झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर एक नाग फांदीवर आला. त्याला पोत्यात घेण्यात आले. हळूहळू दोन्ही दोरखंडांच्या साहाय्याने पोते वर घेण्यात आले व त्यातील नाग पकडण्यात आला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. एक नाग सापडला नाही.मंगळवारी मांगले येथील उत्तम गावडे यांच्या विहिरीतही नाग असल्याचे समजले. त्यालाही श्रीराम नांगरे, दिग्विजय शिंदे, श्रीनाथ गव्हाणे, रोहित गावडे यांनी विहिरीतून बाहेर काढले व नैसर्गिक अधिवासात सोडले.यापूर्वीही वाचवले नागांनाशिराळकरांनी यापूर्वी अनेक जखमी नागांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. नांगरट करताना नांगरात अडकलेल्या, कूपनलिका - विहिरीत अडकलेल्या, वाहनांच्या धडकेत, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागांचे प्राण वाचवले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळा