शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

शिराळा नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत

By admin | Updated: May 11, 2017 23:21 IST

शिराळा नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत होत असून, गुरुवारी अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी आठ अपक्ष व भाजपच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. भाजपने महाडिक युवा शक्तीबरोबर युती केली आहे. १७ प्रभागांमध्ये ५० मुख्य राजकीय पक्षांचे, तर ६ अपक्ष असे ५६ उमेदवार रिंगणात आहेत. या लढतीत प्रामुख्याने प्रभाग दोनमधील लढतीकडे सर्व राजकीय नेत्यांचे व नागरिकांचे लक्ष आहे.गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे गेले तीन-चार दिवस राजकीय चर्चा, अर्ज माघारी, आघाडी कोणाबरोबर करायची व कशी करायची, याची चर्चा अगदी दुपारी दोन वाजेपर्यंत चालूच होती. कॉँग्रेसने प्रथम भाजपबरोबर व नंतर राष्ट्रवादीबरोबर आघाडीसाठी चर्चा केली. मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही. बुधवार दि. १० रोजी भाजपचे रणजितसिंह नाईक, महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, केदार नलवडे यांच्यात चर्चा होऊन, महाडिक युवा शक्तीने भाजपला पाठिंबा दिला. यामध्ये प्रभाग १४ मधील भाजप उमेदवार वैभव कांबळे यांनी माघार घेऊन महाडिक युवा शक्तीचे रामचंद्र जाधव यांना भाजप पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. या अपक्ष उमेदवारासह पाच प्रभागात सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, तर १२ प्रभागात तिरंगी लढत होणार आहे.प्रभाग ७ मध्ये मीनाक्षी यादव, प्रभाग १० मध्ये दीपक गायकवाड, प्रभाग ११ मध्ये मंदार उबाळे, प्रभाग १४ मध्ये रामचंद्र जाधव व अनिल माने, प्रभाग १६ मध्ये दिलीप घाटगे असे सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. हे अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांची डोकेदुखी बनणार आहेत. अनेक प्रयत्न करुनही त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी झालेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. या अपक्षांचा फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.प्रभाग दोनमध्ये दोन नाईक घराण्यात होणारी लढत ही प्रमुख लढत मानली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान रणजितसिंह नाईक यांच्या कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचे लहान बंधू अभिजित नाईक यांच्याविरुध्द त्यांचे पुतणे व माजी पं. स. सभापती अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांचे पुत्र विश्वप्रतापसिंग नाईक या काका-पुतण्यांची लढत होत आहे.याचबरोबर प्रभाग ८ मध्ये दोन सख्ख्या भावजयींची लढत आहे. राष्ट्रीय कॉँग्रेसतर्फे अर्चना कदम, तर भाजपतर्फे नंदाताई कदम यासख्ख्या जावांमध्ये लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीतर्फे अर्चना शेटे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. याचबरोबर नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव असल्याने प्रभाग चारमध्ये चित्रा दिवटे (कॉँग्रेस), राजश्री यादव (भाजप), रंजना यादव (राष्ट्रवादी), प्रभाग ६ मध्ये सीमा कदम (भाजप), रहिमतली मुल्ला (कॉँग्रेस) व ज्योती शेटे (राष्ट्रवादी) या दोन प्रभागातील विजयी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी पात्र ठरणार असल्याने या दोन प्रभागातील लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ही तिरंगी होणारी लढत सर्वत्र चुरशीची ठरणार, हे नक्की असल्याची चर्चा आहे.