शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शि. द. पाटील यांच्याशी कधीच मनोमीलन होणार नाही

By admin | Updated: December 16, 2014 00:11 IST

संभाजी थोरात : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी एकटाच समर्थ

वाटेगाव : शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांमुळेच मी मोठा झालो आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी उपोषण करण्याची माझी तयारी आहे. फक्त तुमची साथ गरजेची आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी एकटाच समर्थ आहे. या जन्मात तरी मी आणि शिवाजीराव पाटील एकत्र येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांनी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे झालेल्या शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजी चव्हाण, सरचिटणीस वसंत शिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.संभाजी थोरात म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजीकच्या काळात शिक्षकांच्या फायद्याची सर्व ती माहिती देण्याचे काम केले जाईल. अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.वाळवा पं. स. चे सभापती रवींद्र बर्डे म्हणाले, शिक्षकांनी शिक्षक संघटनांच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शासन स्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वते प्रयत्न करू, असे त्यांनी आश्वासन दिले.यावेळी शि. द. पाटील गट व शिक्षक समितीमधून कृष्णात सूर्यवंशी, सतीश विरभक्त, शिवाजी पाटील, बाबासाहेब थोरात, शरद पाटील, बंडू बामणे, केंद्रप्रमुख नजमा पिरजादे या शिक्षकांनी संभाजी थोरात गटात प्रवेश केला.यावेळी विभागीय अध्यक्षपदी तानाजी खोत, प्रमुखपदी अजित पाटील यांच्यासह शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कुमार बल्लाळ, नंदकुमार पाटील, दादासाहेब खोत, रमेश चव्हाण, शांताराम सपकाळ, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. शिवाजी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सवंत शिंगारे यांनी स्वागत केले. गोपाळ पाटसुते यांनी आभार मानले. (वार्ताहर)बँकेची निवडणूक स्वबळावरराज्यात प्राथमिक शिक्षक संघाला लोकप्रियता आहे. म्हणूनच राज्यातील सर्व शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या झेंड्याखाली एकत्र यावे. शिक्षक सभासदांचे आर्थिक संवर्धन करण्यासाठी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.