शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:21 IST

सांगली महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगावमधील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली असल्याची तक्रार गुरुवारी आयुक्तांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देशेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी शेतकऱ्यांची पिके वाळू लागल्याची आयुक्तांकडे तक्रार

सांगली : महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगावमधील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली असल्याची तक्रार गुरुवारी आयुक्तांकडे करण्यात आली.धुळगाव येथील ग्रामस्थ डॉ. विनोद डुबल, भास्कर डुबल, सागर डुबल, श्रीकांत शिंदे, अजितसिंह डुबल, महंमद कामिरकर, नरेंद्र पाटील, श्रीकांत सूर्यवंशी, राजू देवर्षी, दामाजी डुबल, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, मौला मगदूम यांच्यासह शेतकऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका शेरीनाला योजनेच्या धुळगावकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हची आयुक्तांच्या आदेशानुसार दुरुस्ती केली होती. ती तोडून सध्या पाणीचोरी सुरु आहे. यामुळे मूळ लाभार्थी असलेल्या धुळगावच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी जात नाही. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून धमकावले जात आहे.दमदाटी, शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शेरीनाल्याची जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरोधात महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वीच नोटिसा बजाविल्या होत्या. यात महापालिकेने पाणी चोरी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पण प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाणी चोरणाऱ्यांचे धाडस वाढले आहे.

एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती केली असतानाही, ती तोडून पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे धुळगावमधील आॅक्सिडेशन पाँडपर्यंत शेरीनाल्याचे पाणीच पोहोचत नाही. या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली