शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ बेवारस वृद्धा मृत्यूच्या दाढेतून बाहेर!

By admin | Updated: February 13, 2015 22:58 IST

दीड महिने सेवा : ‘इन्साफ फौंडेशन’चा पुढाकार; ‘सिव्हिल’कडून औषधोपचार

सचिन लाड - सांगली -बरोबर दीड महिन्यांपूर्वीची घटना. साठ वर्षांची वृद्धा... हाता-पायात किडे पडलेली... स्वत:च्या पायावर उभे राहून चालताही येत नव्हते... अशा अवस्थेत भुकेने व्याकुळ झालेली... ‘कोणी तरी मला दवाखान्यात न्या रे’, असा तिचा टाहो सुरू होता. मृत्यूशी झुंज देत रस्त्यावरच तडफडत पडलेली ही वृद्धा आता ठणठणीत बरी होऊन स्वत:च्या पायावर चालू लागली आहे. कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही. मात्र इन्साफ फौंडेशन ही सामाजिक संस्था व सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाने या वृद्धेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. यासाठी दीड महिना तिच्यावर औषधोपचार सुरू होते. येथील सांगली अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही वृद्धा तडफडत पडली होती. हाताला व पायाला तारा गुंडाळलेल्या होत्या. अंगात फाटके-तुटके कपडे होते. ही वृद्धा कोण? कोठून आली? याची कुणालाही माहिती नव्हती. थंडीच्या कडाक्यात भुकेने व्याकुळ होऊन विव्हळत पडली होती. तिच्या हाताला व पायाला जखमा झालेल्या होत्या. त्यातून किडे बाहेर पडत होते. दुर्गंधी पसरल्याने तिच्या समोरून जाण्याचे धाडस कोणीही करीत नव्हते. हाता-पायाला झालेल्या जखमांमुळे तिला स्वत:च्या पायावर उभे राहताही येत नव्हते. ‘प्यायला कोणी पाणी तरी देता का?’ असे म्हणून ती ओरडत होती. रस्त्यावरून जाणारा प्रत्येकजण केवळ बघ्याची भूमिका घेत होता. सांगलीतील इन्साफ फौंडेशन या सामाजिक संस्थेला याची माहिती मिळाल्यावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राणिमित्र मुस्तफा मुजावर, तौफीक शेख, प्रताप शिंत्रे, निखिल सातपुते, अनिल बेपारी, रोहित दांडेकर यांनी या वृद्धेची भेट घेतली. तिला शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविली. परंतु वृद्धेकडे पाहून रुग्णवाहिका चालकही तिला नेण्यास तयार होत नव्हता. शेवटी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली. पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या पुढाकाराने रुग्णवाहिका मिळविली. त्यानंतर वृद्धेला रुग्णालयात दाखल केले. दीड महिन्यांपासून तिच्यावर सुरु होते. यासाठी लागणारी औषधे रुग्णालय व संस्थेने उपलब्ध केली. उपचारादरम्यान संस्थेचे पदाधिकारी दररोज जाऊन माहिती घेत होते. ती आता ठणठणीत बरी झाली आहे. स्वत:च्या पायावर उभा राहून चालते. हात-पाय बरे झाल्याचे हास्य तिच्या चेहऱ्यावर दिसून येते. पायाला दोरे, तार बांधून जखम झाल्याने मृत्यूशी झुंज...हात आणि पाय दुखत असल्याने ही वृद्धा दोरे व तार बांधायची. यातून तिला जखमा झाल्या होत्या. या जखमावर औषधोपचार न झाल्याने किडे पडले होते, अशी माहिती उपचार करताना समोर आली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास कुऱ्हेकर, सहाय्यक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक भारती यांच्या पथकाने वृद्धेवर उपचार केले. रुग्णालयातील समाज सेवा अधीक्षक संजय खाडे व किरण कांबळे यांनी मदत केली. एका बेवारस व मृत्यूच्या दाढेत गेलेल्या वृद्धेला बाहेर काढणे, हे मोठे आव्हान होते. केवळ इन्साफ फौंडेशने पुढाकार घेतल्याने ही शक्त झाले, असे डॉक्टरांनी सांगितले.प्रकृती ठणठणीत झालेल्या वृद्धेच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. यामुळे तिला तिचे नाव व गाव सांगता येत नाही. आता तिला सोडायचे कुठे? असा प्रश्न पडला आहे. तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणी तरी पुढे यावे, असे आवाहन मुस्तफा मुजावर यांनी केले आहे.