लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांची मध्य रेल्वे समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सांगलीत सत्कार करण्यात आला आहे.
निवडीबद्दल शरद शहा म्हणाले की, केंद्र शासनाकडून मिळालेल्या संधीचा सांगली जिल्ह्यासाठी कसा फायदा करून घेता येईल, हे पाहणार आहे. मिरज येथे रेल्वे विभाग स्थापन करणे, लोकल पॅसेंजर गाड्या सांगलीतून सोडणे, सांगली स्टेशन येथे पार्सल सेवा सुरू करणे, सांगली स्टेशनवर ईंडीकेटर, सांगली व मिरज स्टेशनचा विकास करण्यासाठी प्रथम प्राधान्य असणार आहे. सांगली रेल्वे स्टेशनला लोकल गाड्यांचे थांबे व मिरजला लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे आणि मार्ग बदलण्यावरही विचार करणार आहे. किसान रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सांगली चेंबर ऑफ कॉमर्समार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.