शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सरसकट कर्जमाफीची धमक मुख्यमंत्र्यांत नाही : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:06 IST

शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देमणेराजुरीत सभा; गडकिल्ल्यात छमछम वाजवू पाहणारे सरकार हटवा

तासगाव : उद्योगपतींनी बुडवलेले ८१ हजार कोटींचे कर्ज सरकारने भरले. मात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची धमक मुख्यमंत्री आणि सरकारमध्ये नसल्याची टीका राष्टवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे मंगळवारी केली. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांत छमछम वाजवू पाहणा-या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्टÑवादीच्या उमेदवार, आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा झाली. यावेळी आमदार पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, रोहित पाटील, राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अरुण लाड, अनिता सगरे, बाजार समितीचे सभापती जयसिंग जमदाडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफी करण्याची धमक नाही. आॅनलाईन कर्जमाफी देणार म्हणून सांगितले. ३१ टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला; मात्र ६९ टक्के लोकांना छदामसुध्दा मिळाला नाही. आम्ही १२ टक्क्यांचे व्याज शून्य टक्क्यांपर्यंत आणले. आजही तसाच लाभ दिला जातो; मात्र हे सरकार याप्रश्नी उदासीन आहे.पवार म्हणाले, महाराष्टÑ आमच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री सांगतात, मैदानात आमच्यासमोर पैलवान नसल्याचे सांगतात, पण मी त्यांना सांगितले, ‘मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. कुस्तीचे काम तुमचे नव्हे’. अमित शहा प्रश्न विचारतात,‘पवार साहबने क्या किया’. हे मोदींचा हात धरून गुजरातमधून केंद्रात आले.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा देशाला माहीत तरी होते का? महाराष्टÑात सत्ता यांची. यांनी काय केले हे सांगायचे सोडून पवारांनी काय केले, हे विचारतात. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केले. त्यानंतर वीटसुध्दा टाकली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. भाजप सरकारने भूमिपूजन केले. त्याचीही पाच वर्षात वीट पडली नाही. महाराष्टÑाचे किल्ले सुधारणार, असे सांगून तेथे हॉटेल, बार काढण्याचा निर्णय या सरकारने घेतला. बार म्हटले की छमछम आलीच. जेथे शिवबांची तलवार तळपली, तिथे छमछम वाजवणार असतील, तर यासाठी सरकारला मते द्यायची का?आबांना महाराष्ट्र विसरणार नाहीतासगाव कारखाना सुरू करण्याचा आर. आर. पाटील यांचा ध्यास होता. तो सुरू केला नाही. आबा गेल्याचे दु:ख आहे; मात्र आबांचा विचार महाराष्ट कदापी विसरणार नाही. आबांच्या विचारांसाठी सुमनतार्इंना निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSangliसांगली