शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अरुणअण्णांच्या विजयात शरद लाड किंगमेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

अशुतोष कस्‍तुरे पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघाच्‍या निवडणुकीत भाजपचा गड सर करून अरुणअण्णा लाड आमदार झाले. या विजयाने जिल्ह्यात ...

अशुतोष कस्‍तुरे

पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघाच्‍या निवडणुकीत भाजपचा गड सर करून अरुणअण्णा लाड आमदार झाले. या विजयाने जिल्ह्यात महाविकास आघाडीला बळ मिळाले आणि पलूस-कडेगाव मतदारसंघाचे राजकीय समीकरणच बदलून गेले. अण्णांच्या विजयात महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा जसा हात होता, तेवढेच त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांचे मायक्रो प्लॅनिंगही अरुणअण्णांना आमदार करण्यात महत्त्वाचे ठरले.

पदवीधर निवडणुकीमध्‍ये प्रचाराची व्‍यूहरचना आखण्यापासून ते मनुष्‍यबळाचे योग्य नियोजन करण्यापर्यंतचे सर्व नियोजन शरद लाड यांनी केले. ते कुठेही प्रसिध्दीमध्ये दिसत नसले, तरी तेच या निवडणुकीत पडद्यामागचे खरे सूत्रधार होते. त्यांनी पाचही जिल्‍ह्यांतील राष्‍ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांच्‍या प्रमुखांची भेट घेऊन अरुणअण्णांची भूमिका त्यांना पटवून दिली. स्‍थानिक नेतेमंडळींच्‍या साहाय्याने प्रत्‍येक मतदारापर्यंत पोहोचण्‍याचा त्यांनी प्रयत्‍न केला. यासाठी त्‍यांच्‍या मदतीला क्रांती उद्योग समूह, भारती विद्यापीठ, राजारामबापू उद्योग संकुल, प्रत्‍येक जिल्‍ह्यातील नेत्‍यांच्या संस्‍थांतील कार्यकर्ते होते. या सर्वांचे सारथ्‍य करताना शरद लाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्‍याही घटकाची नाराजी न घेता प्रत्‍येक प्रश्‍न चोखंदळपणे मांडला.

मागील निवडणुकीतील अनुभवाच्‍या जोरावर शरद लाड यांनी मायक्रो प्‍लॅनिंग करून प्रत्येक घटकापर्यंत कार्यकर्त्यांना पाठविले. मतदान करून घेण्यापर्यंतचे जाळे त्यांनी तयार केले होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधील प्रमुख नेत्‍यांशीही त्यांनी तेवढाच संपर्क ठेवला होता. त्यांच्या मदतीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. शरद लाड यांनी या निवडणुकीमध्‍ये अर्जुनाचे सारथ्‍य जसे श्री कृष्‍णाने केले होते, तसे या निवडणुकीत शरद लाड यांनी सारथ्‍य करून विजयाची माळ आपल्‍या वडिलांच्‍या गळ्यात घातली. या विजयामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात महाविकास आघाडीची शक्ती वाढली आहे. कदम-लाड एकजुटीमुळे सर्व निवडणुका त्यांच्यासाठी सोप्या झाल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

लाड-कदम गटात गोडवा

पदवीधर संघाच्या निवडणुकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी चोख भूमिका बजावून पूर्वीपासून असलेली लाड आणि कदम गटातील दरी संपविण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यानिमित्ताने कदम-लाड गटात गोडवा निर्माण झाला आहे.