शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बॅंक खात्यावर सात लाख रुपये जमा झाले, सांगलीतील छायचित्रकाराने प्रामाणिकपणे परत केले

By संतोष भिसे | Updated: September 27, 2024 17:27 IST

सांगली : तुमच्या खात्यावर अचानक लाखो रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? याचे उत्तर सांगलीतील मुक्त छायाचित्रकार रवी ...

सांगली : तुमच्या खात्यावर अचानक लाखो रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? याचे उत्तर सांगलीतील मुक्त छायाचित्रकार रवी काळेबेरे यांनी कृतीद्वारे दिले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बॅंक खात्यात चक्क सात लाख रुपये जमा झाले, ते त्यांनी त्वरित बॅंकेला परत केले.सात लाख जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर येताच एखाद्या फसव्या योजनेचा मेसेज असावा म्हणून काळेबेरे यांनी सुरुवातीला दुर्लक्षही केले. पण चौकशीअंती खरोखरच पैसे जमा झाल्याचे स्पष्ट झाले. एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या बेंगलुरु येथील शाखेतून तांत्रिक चुकीमुळे सांगलीतील काळेबेरे यांच्या खात्यामध्ये आले होते. त्यांनी शाखाधिकाऱ्यांना त्वरित माहिती दिली. शाखाधिकाऱ्यांनी बेंगलुरुमधील शाखेतून झाल्या प्रकाराची खातरजमा केली. काळेबेरे यांच्याकडून धनादेशाद्वारे पैसे परत घेतले. बेंगलुरु शाखेने त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदनाचे अणि धन्यवादाचे पत्र पाठविले.सांगलीत सराफ कट्ट्यावर सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सराफ समितीचे अध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, भाजप नेते पृथ्वीराज पवार, रवी यांच्या मातोश्री विमल, सुनील पिराळे, सुधाकर नार्वेकर, सावकार शिराळे, गजानन पोतदार, चंद्रकांत मालवणकर, सुरेश जाधव, राजू कासार, संजय काळेबेरे, संजय मोहिते, विनायक साळुंखे, अशोकराव मालवणकर, बळीराम महाडिक, अशोक बेलवलकर आदी उपस्थित होते.

तासाभराचे लखपतीकाळेबेरे यांच्या खात्यात सात लाख जमा झाल्यानंतर बॅंकेत जाऊन पैसे परत करेपर्यंत तासाभराचा वेळ गेला. त्यामुळे काळेबेरे तासाभराचे का होईना, लखपती ठरले.

असाही अप्रामाणिकपणादरम्यान, याच बॅंकेत एका खातेदाराच्या खात्यात दोन वर्षांपूर्वी ७६ हजार रुपये तांत्रिक चुकीमुळे वळते झाले. बहाद्दराने पैसे लगेच काढून घेतले. खर्चही केले. बॅंकेच्या पाठपुराव्यानंतर २५-३० हजार रुपये परत केले. उर्वरित पैशांच्या वसुलीसाठी बॅंकेचे अधिकारी हात धुवून त्याच्या मागे लागले आहेत, पण तो पैसे परत करण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर काळेबेरे यांचा प्रामाणिकपणा उजळून निघाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक