शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

एरंडोलीतील सात लाखाच्या चोरीचा छडा

By admin | Updated: December 24, 2015 00:35 IST

दोन गुन्हे उघडकीस : दोघांना अटक, दोन वाहनांसह नऊ लाखांचा ऐवज हस्तगत

मिरज : मिरज ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून, एरंडोली (ता. मिरज) येथील हार्डवेअर दुकानातील सात लाखांची चोरी उघडकीस आणली. उमेश हिप्परकर (रा. घालवाड, ता. शिरोळ) व सतीश ऊर्फ सचिन महादेव रोडे (रा. एरंडोली, ता. मिरज) अशी त्यांची नावे असून, दोन गुन्ह्यांतील वाहने, पिस्तुलासह ९ लाख २७ हजाराचा ऐवज जप्त केला. एरंडोली येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी महेश दिनकर पाटील यांचे पाटील ट्रेडर्स हे हार्डवेअर साहित्य व शेती अवजारे विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातील साहित्य, शेती अवजारे व पाटील यांच्या मालकीची पिकअप् जीप (क्र. एमएच १० झेड ९७६९) असा पावणेसात लाखाचा ऐवज चोरून नेला. पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक विजयकुमार मराठे यांच्या पथकाने खंडेराजुरी येथील विशाल बाळासाहेब रूपनर यास चोरीच्या मोटारीसह ताब्यात घेतले. रूपनर याच्याकडे चौकशी केली असता, तो उमेश हिप्परकर याच्या टोळीत सहभागी होऊन चोऱ्या व घरफोडीचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. हिप्परकर व रोडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, त्यांनी एरंडोलीत पाटील ट्रेडर्स हे दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेली जीप व साहित्य असा पावणेसात लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.हिप्परकर याचे साथीदार रूपनर व अमोल आपटे यांनी म्हैसाळ रस्त्यावर कल्लाप्पा वनजोळ या अथणीतील वकिलास अडवून, पिस्तुलातून गोळीबार करीत त्याची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. लूटमारीच्या उद्देशाने वकिलाचेही अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वकिलाने स्वत:ची सुटका करवून घेतली होती. या प्रकरणातील रूपनरला चोरलेल्या मोटारीसह बारामती येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अडीच लाखाची मोटार हस्तगत करण्यात आली. या प्रकरणातील अमोल आपटे फरारी असल्याचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)आरगला चंदन तस्करी : तिघांना अटकआरग येथे अवैध चंदन तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २२ हजार ५०० रूपये किमतीचे नऊ किलो चंदन जप्त केले. मंगळवारी रात्री मोटारसायकलवरून चंदन घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी संशयावरून अडवले असता, त्यांच्याकडे अवैध चंदन सापडले. याप्रकरणी सूरज नजरूद्दीन नदाफ (वय २२), भास्कर भाऊ खंदारे (६०, रा. गौरवाड, ता. शिरोळ), नेताजी शिवाजी नाईक (३९, रा. आरग) या तिघांना अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी सागर आंबेवाडीकर यांनी तिघांविरूध्द मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.पिस्तूल जप्तम्हैसाळ रस्त्यावर वकिलाचे अपहरण व लूट प्रकरणातील विशाल रूपनरने वकिलास एअरगनचा धाक दाखविल्याचे पोलिसांना खोटे सांगितले होते. मात्र पोलिसांनी हिप्परकर व रोडे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर, विशालने वकिलास लुटण्यासाठी खरे पिस्तूल वापरल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहे.