शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बागणीत अकरा तलवारींसह सात कुकरी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:58 IST

सांगली : बागणी (ता. वाळवा) येथे दुधगाव रस्त्यावरील शिकलगार शेतवस्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी छापा टाकून घातक शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये ११ तलवारी व सात कुकरींचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.अटक केलेल्यांमध्ये इमामुद्दीन बाबालाल शिकलगार (वय ४८), ...

सांगली : बागणी (ता. वाळवा) येथे दुधगाव रस्त्यावरील शिकलगार शेतवस्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी छापा टाकून घातक शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये ११ तलवारी व सात कुकरींचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.अटक केलेल्यांमध्ये इमामुद्दीन बाबालाल शिकलगार (वय ४८), हारुण हामीद शिकलगार (३७, दोघे रा. मोमीन गल्ली, बागणी) व शब्बीर नरुद्दीन शिकलगार (२९, शिकलगार वस्ती, बागणी) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हवालदार युवराज पाटील यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांना मंगळवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ माजली आहे. त्यांनी हा शस्त्रसाठा कोठून व कशासाठी आणला? याबद्दल चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी व दरोड्यातील गुन्हेगार तसेच बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या संशयितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी सकाळी निरीक्षक पिंगळे यांना बागणीत दुधगाव रस्त्यावर शिकलगार वस्तीवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पिंगळे यांच्या पथकाने या वस्तीवर छापा टाकला. संशयित शब्बीर शिकलगार याच्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्याची चाहूल लागताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आले. घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी ११ तलवारी व सात धारदार कुकरी सापडल्या. हा शस्त्रसाठा पंचांसमोर जप्त करण्यात आला.सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार राजू कदम, हवालदार युवराज पाटील, गजानन घस्ते, अमित परीट, राजू मुळे, सुनील लोखंडे, शशिकांत जाधव, सचिन कनप यांनी या कारवाईत सहभाग घेतला.