शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची एलबीटीत अधिकाऱ्यांशी ‘सेटलमेंट’

By admin | Updated: March 24, 2016 23:37 IST

अतुल शहा : चार्टर्ड अकौंटंटची निवड बेकायदेशीर; पालिकेकडून त्रास

सांगली : महापालिकेने कर भरलेल्या व्यापाऱ्यांचीच दप्तर तपासणी सुरू केली आहे. ज्यांनी कर भरलेलाच नाही, अशा ठराविक व्यापारी व अधिकाऱ्यांची ‘सेटलमेंट’ झाली आहे, अशी टीका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केली. ते म्हणाले की, शासनाने कुठेही एलबीटीच्या कायद्यात अशाप्रकारच्या खासगी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याविषयी उल्लेख केलेला नाही. तरीही महापालिकेने अशा नियुक्त्या करून व्यापाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. जकात अस्तित्वात असताना महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीच कागदपत्रांची तपासणी करीत होते. आताची तपासणीही महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच करावी. बाहेरचे सी.ए. व वकील नेमून महापालिका जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत आहे. दरमहा लाखो रुपये या कामासाठी या नियुक्त लोकांवर खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे या सर्व रकमेची वसुली संबंधित आयुक्तांकडून करून घ्यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. ज्या व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर भरला आहे, त्यांचीच चौकशी होत आहे. दुसरीकडे ज्यांनी कोणताही कर भरलेल्या नाही, असे हजारो व्यापारी निवांत आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि त्यांच्यात सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे. महासंघ अशा व्यापाऱ्यांना कधीच पाठीशी घालणार नाही. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेलाच अपेक्षित उद्दिष्ट गाठता आलेले नाही. त्यामुळे निश्चितच प्रक्रियेत काहीतरी गोलमाल आहे. या प्रकरणाची चौकशी आयुक्तांनी करावी. कर भरण्याबद्दल आमची तक्रार नाही, तर नाहक त्रासाबद्दल तक्रार आहे. यासंदर्भात उपमहापौर विजय घाडगे व स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी या गोष्टी कायदेशीरच असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महापालिकेने याबाबत शासनाची मान्यता नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही याबाबत शासनाकडे तक्रार करणार आहोत. (प्रतिनिधी)...तर कायदेशीर लढामहापालिकेने तातडीने नियुक्त केलेले खासगी सीएचे पॅनेल या प्रक्रियेतून बाजूला केले नाही आणि शासनानेही दखल घेतली नाही, तर आम्ही संबंधितांविरोधात न्यायालयात दाद मागू, अशा इशारा अतुल शहा यांनी यावेळी दिला.