शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ॲट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा: गोपीचंद कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 14:07 IST

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये पोलीस विभागाने विहीत मुदतीत आरोपपत्र दाखल करावे. जातीच्या दाखल्याअभावी प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा व प्रलंबित प्रकरणे त्वरीत मार्गी लावावीत, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिल्या.

ठळक मुद्देॲट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा: गोपीचंद कदमजिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

सांगली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये पोलीस विभागाने विहीत मुदतीत आरोपपत्र दाखल करावे. जातीच्या दाखल्याअभावी प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा व प्रलंबित प्रकरणे त्वरीत मार्गी लावावीत, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिल्या.जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य सुरेश दुधगावकर, संदेश भंडारे उपस्थित होते.यावेळी सदर कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे निर्णायक पातळीपर्यंत गेली पाहिजेत या दृष्टीने ती प्राधान्याने हाताळावीत, असे सांगून अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, जातीच्या दाखल्याअभावी प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, जातीचे दाखले लवकर उपलब्ध व्हावेत यासाठी संबंधितांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे समन्वय साधून प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लागावीत. यासाठी संबंधित यंत्रणांनी प्राधान्यक्रमाने कार्यवाही करावी, असे सांगितले.अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या आणि निपटारा करण्यात आलेल्यात प्रकरणांचा आढावा घेतला. यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या 10 प्रकरणी पहिल्या हप्त्याची रक्कम व दुसऱ्या हप्त्यातील 19 प्रकरणी शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम पीडित व्यक्तीस देण्याबाबत मंजुरी देण्यात आली. तसेच बैठकीत विविध प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करून संबंधिताना योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याबाबत निर्देश देण्यात आले. प्रारंभी सहायक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी मागील बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. 

 

 

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाSangliसांगली