शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवे उद्योग आणण्यासाठी आता मुंबईत ठाण मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत केली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सकल जैन समाजातर्फे येथील राजमती भवनात सांगलीत पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सत्कार मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. लाड व जयंत पाटील यांना यावेळी संस्कृतमधील मानपत्र प्रदान केले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, पदवीधरांचे शंभरहून अधिक प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीची आहे. पदवीधरांनी भाजप हा पक्ष नुकसान करणारा आहे, हे ओळखून त्यांनी लाड यांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी आता हे प्रश्न सोडविण्यासाठी सहा वर्षे पाठपुरावा करावा. शासनामार्फत आम्ही त्यासाठी ताकद लावू.

पदवीधरांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी एक संकेतस्थळ किंवा पोर्टल तयार करुन लाड यांनी प्रथम पदवीधरांच्या प्रश्नांची यादी तयार करावी. ते प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवायचे, याचा विचार केला जाईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे.

सुरेश पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कर्नाटकात जितक्या सवलती जैन समाजाला मिळतात, तितक्या महाराष्ट्रात मिळत नाहीत. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. मुस्लिम समाजाला आरक्षण व सवलती देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. त्याप्रमाणे अन्य अल्पसंख्याकांचेही प्रश्न सोडवावेत. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सुरेश बेदमुथा, संजय बजाज आदी उपस्थित होते.

चौकट

पाखरांपेक्षा निष्ठावंतांना किंमत द्या

सुरेश पाटील म्हणाले की, जिथे पीक येईल तिथे येणाऱ्या राजकीय पाखरांना त्यांची जागा दाखवून निष्ठावंतांना चांगली संधी द्यावी. असे झाले तर पक्षवाढीसाठी त्याचा फायदा होईल.

चौकट

वॉच ठेवायलाच हवा

पदवीधरच्या निवडणुकीत कोणी किती कष्ट केले, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यावेळी बजाज यांनी, लाड यांची माणसे तरीही आमच्यावर वॉच ठेवत होती, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, तसा वॉच असायलाच पाहिजे. यावर उपस्थितांत हशा पिकला.