शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत समाजकल्याण विभागाच्या दहा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:36 IST

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. या भरतीस जबाबदार असलेले तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त ...

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. या भरतीस जबाबदार असलेले तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त सचिन कवले यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयातील आणि जिल्ह्यातील वसतिगृहामधील शिपाई पदाच्या २७ रिक्त जागांसाठी ७ सप्टेंबर २०१४ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून लगेच लेखी परीक्षा घेतली होती. त्याचदिवशी निवड यादीही प्रसिध्द करण्यात आली. प्रत्यक्षात ही यादी प्रसिध्द करताना निवड समितीचा कोठेही विचार करण्यात आला नाही. निवड समितीला डावलून भरती प्रक्रिया राबविल्याबाबत तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. रिक्त जागांची भरती करताना बिंदू नामावलीबाबत महसूल विभागाच्या सहायक आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आली नाही. शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविताना पारदर्शक पध्दतीचा अवलंब करणे अभिप्रेत असताना, सामान्य प्रशासनाच्या नियमांचे पालन झाले नाही.ही सर्व भरती प्रक्रियाच राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी नियमबाह्य ठरविली आहे. या भरतीमधील २७ पैकी तृप्ती रवींद्र आपटे (मुलींची निवासी शाळा, बांबवडे, ता. पलूस), अंकुश जयसिंग पाटील (मुलांचे वसतिगृह तासगाव), शरद सदाशिव कोळेकर (मुलांचे वसतिगृह, कवठेमहांकाळ), भगवंत दादू कोकरे (मुलांचे वसतिगृह, जत), संतोष सोमा साबळे (मुलांचे वसतिगृह, कडेगाव), विजयश्री बबन भालचिन (मुलींचे वसतिगृह, पलूस), दिनेश बाळासाहेब कलकुटगी (मुलांचे वसतिगृह, विटा, ता. खानापूर), गीता विलास खोत (मुलींचे वसतिगृह, आटपाडी), रोहन संजय दळवी (मुलांचे वसतिगृह, पलूस), सचिन भागवत ढोले (मुलांचे शासकीय वसतिगृह, आटपाडी) या दहा कर्मचाºयांना नियुक्ती दिली होती. त्यांची सेवा दि. १७ सप्टेंबरपासून खंडित केली आहे. उर्वरित १७ कर्मचाºयांना तक्रारी आल्यामुळे नियुक्तीच दिली नव्हती. त्यामुळे त्या कर्मचाºयांची निवड यादी रद्द केली आहे.कर्मचारी न्यायालयात जाणारसहायक आयुक्त कार्यालयाकडे जागा निघाल्यामुळे आम्ही अर्ज करून शासकीय नियमानुसार असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. भरती प्रक्रियेत अधिकाºयांनी चुका केल्या असतील, तर त्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल काही कर्मचाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे केला आहे. या कारवाईविरोधात कामगार न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.समाजकल्याण आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्तांच्या कारवाईमुळे सांगलीच्या सहायक आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे. चुकीच्या, अनियमित, नियमबाह्य भरतीप्रक्रियेस जबाबदार तीन अधिकाºयांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे.