शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 19:03 IST

मिरज, हरिपूर, कृष्णाघाट, बहे, भिलवडीतील निर्मिती थांबली, मिनी इंडस्ट्रीतील रोजगारही बुडाला

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रीकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरित झाली आहेत. चित्रीकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मालिका आणि चित्रपटांची चित्रीकरणे मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. विशेषत: मराठी वाहिन्यांवरील मालिका व लो बजेट चित्रपटांची चित्रीकरणे सातत्याने कोठे ना कोठे सुरू असायची. कोरोनाच्या पहिल्या लाटेत निर्बंधांचे पालन करत छायाचित्रण सुरू राहिले होते. दुसऱ्या लाटेत निर्बंध कडक झाल्यानंतर निर्मात्यांनी गाशा गुंडाळला. गोवा, सिल्वासा, दिव, दमण आदी ठिकाणी स्थलांतर केले. तेथे निर्बंध शिथिल असल्याने, तसेच निसर्गसौंदर्याची स्थळे भरपूर असल्याने चित्रीकरण सोयीचे ठरले.

सांगलीत चित्रीकरणे थांबल्याने त्यातील रोजगारही थांबला. हॉटेल्स व लॉजमधील कलाकारांचे मुक्काम थांबले. सांगली-मिरजेत केटरिंग व्यावसायिकांकडून कलाकारांना जेवण पुरवले जायचे. त्याशिवाय कलाकारांची ने- आण करणारी वाहतूक, मालिकेत सहकलाकार म्हणून मानधनावर मिळणारी संधी, चित्रीकरणासाठी इमारत मालकांना मिळणारे भाडे, अशी मोठी उलाढाल व्हायची. हे सारे अर्थचक्र आता थंडावले आहे.

चित्रीकरणासाठी आवडती डेस्टिनेशन्सकृष्णा आणि वारणा नद्यांचा परिसर, विविध गावांतील ऐतिहासिक वाडे, देखणे फार्महाउस, दंडोबाच्या डोंगररांगा, वाळवा तालुक्यात लांबच लांब पसरलेली फुलशेती ही काही डेस्टिनेशन्स निर्मात्यांना आकर्षित करायची. मिरजेतील कृष्णाघाटावर मालिका व गाण्यांच्या अल्बमची छायाचित्रणे अखंडपणे व्हायची. मिरजेचे भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन सरकारांच्या बेडग रस्त्यावरील देवी भवनमध्ये, तर सुमारे वर्षभरापासून अखंडपणे एका मराठी मालिकेचे छायाचित्रण सुरू होते. वाळवा तालुक्यातील रामलिंग बहे, औदुंबर येथील दत्त देवस्थान, अंकली गावातील ऐतिहासिक वाडे, कवठेएकंद येथील सिद्धनाथ मंदिर, सांगलीत मिशन कंपाउंड, आयर्विन पूल, मालगावचा बावाफन दर्गा ही काही चित्रीकरण स्थळे निर्मात्यांच्या आवडीची ठरली होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस