शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवसात २३०० दुचाकींची विक्री

By admin | Updated: March 31, 2017 23:37 IST

आरटीओ मालामाल : २५ कोटीचा कर शासनाच्या तिजोरीत

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ (भारत स्टेज-३) इंजिन प्रकारातील वाहनांवर १ एप्रिलपासून बंदी घातल्यामुळे नामांकित दुचाकी कंपन्यांनी त्यांच्याकडील बीएस-३ प्रकारातील सर्व वाहनांवर केलेल्या सवलतींच्या वर्षावाचा शुक्रवारी शेवटच्यादिवशी नागरिकांनी चांगलाच फायदा उठविला. रात्री बारा वाजेपर्यंत दोन हजार तीनशे वाहनांची विक्री झाली. यातून सुमारे २५ कोटींचा कर आरटीओंच्या तिजोरीत जमा झाला आहे.सांगली, मिरजेतील अनेक शोरुम्स्मध्ये शुक्रवारी सकाळपासून वाहने खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागून राहिल्या होत्या. वाहन खरेदीसाठी पहिल्यांदाच एवढी झुंबड उडाल्याने शोरुम्समधील कर्मचाऱ्यांना गर्दी नियंत्रित करणे मुश्किल झाले. सांगलीतील मिलेनियम होंडा, पट्टणशेट्टी होंडा, पोरेज् टीव्हीएस, मिरजेतील सिद्धिविनायक या शोरुम्समध्ये सवलती सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी गर्दी केली. मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीचेही विक्रम शुक्रवारी मोठ्या सवलतींच्या वर्षावाने मोडीत निघाले. दिवसभर शोरुम्सना जत्रेचे स्वरूप होते. वाहने मिळविण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू होती. कंपन्यांनी सवलतीचे दर जाहीर केल्याने, ज्याला वाहनाची गरज नाही, त्यांनीही वाहन खरेदी केले. सात हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंतच्या सवलती दुचाकी वाहनांवर होत्या. शुक्रवारी रात्री बारापर्यंत नोंदणी होणारी वाहनेच पासिंग केली जाणार होती. यासाठी शोरुम मालकही जुन्या गाड्या शिल्लक ठेवणार नव्हते. रात्री बाराच्या ठोक्याला खरेदी व्यवहारावर ३१ मार्च २०१७ ही तारीख टाकण्यासाठी शोरुममधील कर्मचाऱ्यांची धडपड सुरु होती. वाहनांचे पासिंग येत्या दोन-तीन दिवसात करण्यास आरटीओंनी मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)