इस्लामपूर : राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या ११ विद्यार्थ्यांची इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. या निवडी कॅम्पस मुलाखतीमधून झाल्या आहेत.
यामध्ये बी. टेक. च्या सुदर्शन चौगुले, कृष्णात अनुसे, इंद्रजित मोहिते, सर्वेश शेवडे, पवन लोंढे, प्रशांत काळे, महादेव तोरमकर, राहुल शेळके, उद्देश रंगारी, व एम. टेक. च्या सुमित नायगावकर आणि रवींद्र क्षीरसागर यांना संधी मिळाली आहे.
या विद्यार्थ्यांचे कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. आर. डी. सावंत, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अभिजीत शाह, ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख डॉ. संजय कुंभार यांनी अभिनंदन केले. विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा. सूरजकुमार कुंभार यांनी विशेष प्रयत्न केले.