शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

चांदोली धरण परिसरासह सुरक्षा रक्षकही असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील सरहद्दीवर ३६७.१७ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असणारे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. अभयारण्यात विविध जातींचे प्राणी, पक्षी, कीटक, विविध प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे जीव यांचे अस्तित्व आहे. याच अभयारण्यातील गवे, रानडुकरांकडून तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे, मणदूर, बेरडेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी परिसर येथील व शाहुवाडी तालुक्यातील उखळू, शितूर, खेडे, शिराळे वारूण या परिसरातील ऊस, भात पिकांचे नुकसान होत आहे. अभयारण्यातील बिबट्यांकडूनही वारंवार हल्ले होत आहेत.सध्या धरण ९१.८१ टक्के भरले आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवाँधार पाऊस सुरू असतो. त्यामुळे धरण परिसरात सुरक्षा व्यवस्था काटेकोर असणे आवश्यक असते, पण धरणाच्या भिंतीवरील पथदिवे कायम बंदच असतात. गेल्या वर्षभरापासून तक्रारी करूनही वरिष्ठांनी दखल घेतली नाही. धरणाच्या गेटजवळील विद्युतपुरवठा प्रशासनाने वीज बिल न भरल्याने वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे परिसर नेहमीच अंधारात असतो. याचा फायदा हिंस्र प्राणी घेतात आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. अंधाराचे साम्राज्य असल्याने हेच प्राणी धरणाच्या सुरक्षा कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला करू शकतात.गुरुवारी पहाटे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. चारच दिवसांपूर्वी धरणाच्या जलाशयातील महाकाय मगर धरणाच्या भिंतीवर आली होती. त्यामुळे धरणावरील कर्मचारी व पोलिस यांच्यात भीतीचे वातावरण आहे. भीतीच्या छायेखालीच ते धरणाची सुरक्षा करतात.