भाेसले म्हणाले, कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. कृष्णा कारखान्याने २०२०-२१ च्या गळीत हंगामात १५४ दिवसांमध्ये १२ लाख १५ हजार १७ टन उसाचे गळीत केले असून, १४ लाख ७६ हजार २०० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.७५ टक्के राहिला आहे. कारखान्याने यापूर्वी शेतकरी सभासदांना २६०० रुपयांचा पहिला हप्ता अदा केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने एफआरपीचा दुसरा हप्ता २०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऊस बिलाची ही रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. ही रक्कम वर्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी प्रतिटन एकूण २८०० रुपये प्राप्त होणार आहेत.
‘कृष्णा’चा दुसरा हफ्ता २०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST