शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर जायंट्सच्या माध्यमातून दुसरे देहदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:48 IST

जितेंद्र येवले । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ हा संदेश घेऊन सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या ...

जितेंद्र येवले ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ हा संदेश घेऊन सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या जायंट्स गु्रपच्या माध्यमातून इस्लामपूर शहरात २०१४ मध्ये पहिले देहदान झाले होते. त्यानंतर आता महादेवनगरातील आदर्श शिक्षक नारायण दुधाप्पा बिर्जे (वय ६९) यांचे गुरुवार, दि. १८ रोजी दुसरे देहदान करण्यात यश मिळाले. २०१४ मध्ये डॉ. जैना शहा यांच्या सहकार्याने कल्पना चव्हाण यांचे शहरात प्रथम देहदान झाले होते.इस्लामपूर शहरात २०१२ पासून जायंट्स गु्रपने नेत्रदान व देहदान चळवळीला सुरु केली. आतापर्यंत शहरातील ११० नागरिकांनी नेत्रदान केले आहे, तर २०१४ मध्ये कल्पना चव्हाण यांनी पहिले देहदान केले होते. ही देहदानाची चळवळ आणखी गतिमान करण्यासाठी जायंट्स वेल्फेअर फौंडेशनचे फेडरेशन डायरेक्टर भूषण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जायंट्स गु्रप आॅफ इस्लामपूर सहेलीने पुढाकार घेतला आहे. फेबु्रवारी २०१९ पासून अध्यक्षा श्रध्दा कुलकर्णी, चारुशिला फल्ले, डॉ. अनिता पाटील, डॉ. सोनल शहा, प्रतिभा शहा, संगीता शहा, कविता शहा यांनी ‘हो मी अवयव दान करणार’ ही संकल्पना पुढे आणली आहे. आतापर्यंत ६०० नागरिकांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. डॉ. रुजूता टिळे, डॉ. अश्विनी पाटील या देहदानावर व्याख्यान देत आहेत.महादेवनगरातील नारायण बिर्जे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी जायंट्सच्या माध्यमातून निधनापूर्वीच नेत्रदान व देहदानाची सर्व तरतूद केली होती. त्यानुसार त्यांचा मुलगा प्रा. किरण बिर्जे यांनी वडिलांचे देहदान कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कºहाड येथे केले. प्रा. बिर्जे यांनी वडिलांच्या निधनानंतर जायंट्स गु्रप आॅफ इस्लामपूरशी संपर्क साधला. आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करुन दृष्टिदान हे सांगली येथील नेत्र पेढीकडे, तर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टला देहदान केले.हे करणार देहदान...जायंट्सच्या देहदान या उपक्रमाला आता चांगलीच गती आली आहे. ६ जणांनी देहदान करण्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये गांधी चौकातील कुसुम जगन्नाथ चटणे, अंबाबाई मंदिर परिसरातील श्रीमती शालन ज्ञानदेव साळुुंखे, गणेश भाजी मंडईजवळील कृष्णाजी वसंतराव पत्की व त्यांच्या पत्नी सुधा कृष्णाजी पत्की हे दाम्पत्य, उरुण परिसरातील इंदुबाई माने, लाल चौकातील श्रीमती प्रमिला कारंजकर, शिराळा येथील लक्ष्मी आनंदा कदम यांनी देहदानाचा संकल्प केला आहे.नेत्रदान व देहदानयंग जायंट्स सहेलीच्या अध्यक्षा डॉ. सुरभी सर्जेराव यादव यांच्या माध्यमातून नारायण बिर्जे यांचे पहिले नेत्रदान झाले. त्यांनी नेत्रदान आणि देहदान या उपक्रमासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.