शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून नॅचरोपॅथी केंद्राला सील

By admin | Updated: April 20, 2017 22:57 IST

महापालिकेकडून नॅचरोपॅथी केंद्राला सील

सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी बापट मळा येथील नॅचरोपॅथी रुग्णालय सील केले. या रुग्णालयाची महापालिकेकडे नोंदणी नसून, तेथे उपचार करणाऱ्यांना डॉक्टर ही पदवी लावता येत नाही. पात्र नसतानाही त्यांनी डॉक्टर पदवी लावून, त्याची जाहिरात करून रुग्णांची फसवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे डॉ. संजय कवठेकर यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये, ओपीडी रुग्णालये व सोनोग्राफी केंद्रे तपासण्याचे आदेश आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या पथकाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिन्यात कुपवाड उल्हासनगर, भारत सूतगिरणी आदी परिसरातील तीन रुग्णालये सील केली होती. बुधवारी आरोग्य विभागाचे डॉ. संजय कवठेकर, अन्न व औषध प्रशासनचे सावंत, महापालिकेचे औषध निर्माता अष्टेकर आदींच्या पथकाने बापट मळा परिसरात सुरू असलेल्या टच अ‍ॅण्ड केअर वेलनेस ट्रीटमेंट सेंटर या नॅचरोपॅथी रुग्णालयावर छापा टाकला. पथकाने रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी केली. या केंद्र चालकाने बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार महापालिकेकडे नोंदणी केलेली नाही. रुग्णालयात तिघेजण डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वत:च्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लावली आहे. वास्तविक वैद्यकीय कायद्यानुसार अ‍ॅलोपॅथी, आॅर्थोपेडिक यांनाच डॉक्टर पदवी लावता येते. नॅचरोपॅथी उपचार करणाऱ्यांना डॉक्टर पदवी लावता येत नाही. पात्र नसतानाही डॉक्टर पदवी लावून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. शिवाय जाहिरातबाजी करून रुग्णांची फसवणूकही केल्याने या रुग्णालयावर कारवाई करून सील ठोकण्यात आल्याचे डॉ. कवठेकर यांनी सांगितले. या तीन डॉक्टरांविरूद्ध पोलिसांतही तक्रार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)