शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

सांगलीतील गणेश मंडळांचे देखावे खुले

By admin | Updated: September 6, 2016 23:43 IST

नागरिकांची गर्दी : ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर; नव्या तंत्रज्ञानाचाही मूर्ती देखाव्यांसाठी वापर

सांगली : सांगली शहरात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी आपले देखावे खुले केले. यंदा सामाजिक, पौराणिक विषयांसह तांत्रिक देखाव्यांवरही मंडळांनी भर दिला आहे. अनेक मंडळांनी भव्य व आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून या मूर्तीबरोबरच आकर्षक विद्युत रोषणाई यासह सजीव देखाव्यांची परंपराही कायम राखली आहे. सांगली शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंडळांनी महिनाभर आधीपासूनच देखाव्यांची तयारी सुरू केली होती. उत्सवाच्या पहिल्या दिवशीच देखावे खुले होतील, यासाठी प्रयत्न केले. यात काही मंडळांना यशही आले. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी बहुतांश मंडळांनी सायंकाळी देखावे खुले केले. शिलंगण चौक मंडळाने ‘पावनखिंडची लढाई’ हा बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील देखावा उभारला आहे. कॉलेज कॉर्नरजवळील सावकार मंडळाने ‘शिवाजी महाराजांची आग्ऱ्याहून सुटका’ हा देखावा सादर केला आहे. शहीद भगतसिंह मंडळाने गणपतीपुळे येथील गणेश मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे. वखारभागातील लक्ष्मी-नारायण गणेशोत्सव मंडळाने ‘संत तुकारामाचे वैकुंठगमन’ हा संत तुकारामांच्या जीवनातील एका घटनेवर आधारित देखावा उभारला आहे. मोटारमालक संघ मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य-दिव्य देखावा उभारला आहे. लक्ष्मी-नारायण मंडळाने उभारलेला ‘द्रौपदी स्वयंवर’ हा पौराणिक देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कापडपेठ गणेशोत्सव मंडळाने नेहमीप्रमाणे यंदा पौराणिक देखाव्यावर भर दिला आहे. यंदा या मंडळाने ‘पतिव्रता सीता’ हा रामायणातील कथेवरील देखावा केला आहे. बसस्थानक परिसरातील रणझुंजार मंडळाने ‘रावणाला ब्रह्मदेवाचे वरदान’ या कथेवरील पौराणिक देखावा उभारला आहे. वखारभाग मंडळाने ‘लहान मुलांचे हरवलेले बालपण’ या विषयावर सामाजिक देखावा उभारला आहे. पटेल चौक मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्यदिव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. या मंडळाने ‘लंकाधिपती रावणाचे गर्वहरण’ हा देखावा साने गुरुजी उद्यानात उभारला आहे. (प्रतिनिधी) रस्त्यांवर गर्दी : पोलिसांकडून नियोजनशहरातील देखावे पाहण्यासाठी खुले झाल्याने नागरिकांनी मंगळवारी सायंकाळनंतर रस्त्यांवर गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने शहर उजळले आहे. लहान-मोठी गणेश मंडळे भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले असून शहरातील चौका-चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.