शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

बारा कारखान्यांची धुराडी अखेर पेटली

By admin | Updated: November 24, 2014 23:05 IST

उतारा घटला : जिल्ह्यात तीन लाख टन उसाचे गाळप

सांगली : ऊस दराच्या आंदोलनाचा अंदाज घेत जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. अनेकांनी प्रारंभ करून गळीत हंगाम थांबविले होते. गेल्या पंधरा दिवसांत अकरा साखर कारखान्यांनी तीन लाख टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचा उतारा मात्र सरासरी ९.९९ टक्केच असल्यामुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. यामध्ये सहकारी चौदा आणि खासगी दोन कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी वसंतदादा साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. मात्र ऊस उत्पादकांची बिले दिली नसल्यामुळे साखर आयुक्तांनी त्यांचा परवाना रोखला आहे. परंतु, कारखाना प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत परवाना मिळविणार असून, लवकरच गळीत हंगाम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यशवंत (गणपती संघ), माणगंगा कारखान्यांचे गळीत हंगाम अद्याप सुरू झाले नाहीत. विश्वास, हुतात्मा, सोनहिरा, क्रांती, उदगिरी शुगर, सदगुरू श्री श्री रविशंकर, केन अ‍ॅग्रो, महांकाली, राजारामबापू पाटील युनिटच्या चारही शाखांसह बारा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू झाले आहेत. अकरा साखर कारखान्यांनी गेल्या पंधरा दिवसांत तीन लाख टन उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्या चारही शाखांमध्ये जवळपास दीड लाखाहून अधिक गाळप झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असले तरी साखरेचा उतारा मात्र कमी मिळत असल्याच्या कारखाना प्रशासनाच्या तक्रारी आहेत. साखरेचा उतारा कमी आल्यास ऊस दर देण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम धडाक्यात सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गाळपाची स्थिती (टनात)कारखानागाळपउताराहुतात्मा४७०००११.२१विश्वास४७११०१०.३६सोनहिरा४४८३८१०.००क्रांती६७१००१०.१०उदगिरी शुगर३१३३३१०.०५श्री श्री रविशंकर ३१४६०८.८२महांकाली५३००....आंदोलकांनी काढला पळसध्या साखर कारखानदारी अडचणीत असल्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला दर देता येत नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष पॅकेजची गरज आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन छेडण्याची गरज होती. परंतु, संघटनांच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा मंत्रीपदे महत्त्वाची वाटू लागली आहेत. त्यामुळे ते यावर्षी आंदोलने करणार नाहीत. त्यांनी आंदोलनातून एकप्रकारे पळच काढला आहे, अशी टीका क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी केली.