शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

घोटाळ्याचा भार होणार सव्वा दोन कोटीने कमी

By admin | Updated: December 15, 2015 00:23 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : आजी-माजी संचालकांना दिलासा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सव्वाचार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भार आता तब्बल सव्वादोन कोटी रुपयांनी उतरणार आहे. त्यामुळे आजी-माजी संचालक व अधिकाऱ्यांना याप्रकरणी दिलासा मिळणार आहे. अन्य प्रकरणातही कायदेशीर बाबींची पूर्तता करून आणखी काही रक्कम कमी करता येईल का, याचा विचार माजी संचालकांच्या स्तरावर सुरू झाला आहे. जिल्हा बँकेचे २00१-0२ ते २0११-१२ या कालावधीतील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. यातून ४ कोटी १८ लाख रुपयांचा ठपका तत्कालीन संचालक, अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आला होता. चौकशी अधिकाऱ्यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रावरील सुनावणी सुरू असतानाच जिल्हा बँकेच्या काही संचालकांनी वसंतदादा कारखान्याशी चर्चा करून गॅरंटी शुल्काची रक्कम पुन्हा बँकेत जमा करण्याची विनंती केली होती. ही चर्चा यशस्वी झाल्याने वसंतदादा कारखान्याकडून २ कोटी १६ लाख रुपयांचे धनादेश जमा झाले आहेत. दोन वेगवेगळे धनादेश दिले असून यातील १ कोटीचा धनादेश वठला असून त्याची रक्कम जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग झाली आहे. उर्वरित रक्कमही जमा होण्याची चिन्हे असल्याने या घोटाळ्याची रक्कम २ कोटी २ लाख २0 हजारापर्यंत खाली येणार आहे. केवळ गॅरंटी शुल्क प्रकरणात अडकलेल्या आजी-माजी संचालक व अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अन्य प्रकरणांच्या रकमा मोठ्या नाहीत. तरीही त्यातून कायदेशीर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वसंतदादा कारखान्याप्रमाणेच अन्य काही प्रकरणांमधून मार्ग निघाला, तर आजी-माजी संचालकांपैकी अनेकजण जबाबदारीतून बाहेर पडू शकतात. (प्रतिनिधी)२ कोटी १६ लाख रुपये दोन धनादेशाद्वारे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने बँकेकडे जमा केले आहेत. यातील एक धनादेश वठला आहे. दुसराही वठणार असल्याने काही विद्यमान संचालक चौकशी अधिकाऱ्यांना या आरोपातून मुक्त करण्यासाठी लेखी पत्र देणार असल्याचे समजते.