शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

पावसाने सोयाबीन, बाजरीचे नुकसान

By admin | Updated: September 22, 2016 00:47 IST

आटपाडी, जत तालुक्यात जोरदार हजेरी : खानापूर, कडेगाव, शिराळा, मिरज तालुक्यात मध्यम पाऊस

सांगली : सांगली-मिरज शहरांसह जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी दुपारी तासभर मुसळधार पाऊस झाला. आटपाडी, जत तालुक्यात बाजरी पिकाची मळणी सुरू असतानाच पाऊस आल्याने बाजरी पीक भिजले. शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यांत सोयाबीन पीक भिजल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. रब्बी पेरणीसाठी हा पाऊस पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सांगली, मिरज शहरांसह परिसरात दुपारपासून पावसाने सुरुवात केली. अनेक भागामध्ये मुसळधार, तर बहुतांशी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सांगली-मिरज शहरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, गोमेवाडी, हिवतड परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. सध्या बाजरी, मका पिकाची काढणी सुरु असून, दुपारी तासभर झालेल्या पावसामुळे ही पिके भिजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जत शहर व परिसरात अर्धा तास दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बाजरी पिकाची काढणी सुरू असल्यामुळे ही पिके भिजली आहेत. विटा शहरासह काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विटा शहरासह भाळवणी, कळंबी, पारे, बामणी, ढवळेश्वर, रेणावी आदी गावांसह तालुक्यात दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शिराळा तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आहेत. या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र भात पिकास हा पाऊस उपयुक्त आहे. तालुक्यात आता सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आले आहे. शेतकरी पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सोयाबीन काढणी, मळणी करून रब्बी हंगामाची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. (प्रतिनिधी) जतसह परिसरात दमदार पाऊस जत : जत शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी तीन वाजण्याच्यादरम्यान वीस ते पंचवीस मिनिटे दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी उपयुक्त आहे. आठ दिवसांपासून पाऊस झाला नव्हता. दुपारी एक वाजल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दमदार पाऊस झाला. हा पाऊस पेरणीसाठी पोषक असला तरी, पाणी व चारा टंचाई कमी होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. कडेगावात रिमझिम कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वांगी, चिंचणी, अंबक, देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, सोनकिरे, सोनसळ, शिरसगाव सह सर्वत्र पावसाची रिमझिम सुरू आहे. बुधवारी दुपारी चारपासून पाऊस सुरू झाला. यामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली. मागील काही दिवस पावसाने उघडीप दिली होती.