शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघातर्फे शनिवारी धरणे आंदोलन; विनायक शिंदे : जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:32 IST

सांगली : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह राज्यातील सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी,

सांगली : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह राज्यातील सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली. सांगलीत दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले की, राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासकीय सेवेत असणाºया शिक्षकांसह कर्मचाºयांना १९८२ च्या तरतुदीनुसार जुनी पेन्शन व भविष्य निर्वाह निधीची योजना सुरु आहे. या शिक्षक व कर्मचाºयांना नवीन परिभाषित अंशदान योजना सुरु करून शासनाने या कर्मचाºयांवर अन्याय केला आहे. या अन्यायाच्या विरोधात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन व राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही, शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. उलट नवनवीन शैक्षणिक प्रश्न निर्माण करत आहे.

याबाबत शिक्षक संघाच्यावतीने अनेकवेळा आंदोलन तसेच मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकाजाताई मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेले आहे. परंतु आजपर्यंत खोटी आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे.यासाठी शनिवारी, ३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी हंबीरराव पवार, अविनाश गुरव, राजकुमार पाटील, फत्तेसिंग पाटील, पोपट सूर्यवंशी, अरुण पाटील तानाजी खोत, धनंजय नरुले, तुकाराम कांबळे, महादेव पवार, प्रभाकर भोसले, गोरख मोहिते, श्रीकांत पवार, महादेव हेगडे, सुधाकर पाटील, सर्व तालुका अध्यक्ष, बँकेचे संचालक व जिल्'ातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.