शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी सांगली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:56 IST

पुलवामा येथील भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक व सामाजिक संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेनऊ वाजता स्टेशन चौकात श्रद्धांजली सभासर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

सांगली : पुलवामा येथील भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक व सामाजिक संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.शहरातील विविध राजकीय पक्ष, व्यापारी एकता असोसिएशन, व्यापारी संघटना, उद्योजक संघटना, पानपट्टी असोसिएशन, फेरीवाला संघटना, हॉटेल चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत अतिरेकी हल्ल्याचा निषेध व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी सांगली बंदचा निर्णय घेण्यात आला.भारतीय जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांच्या पाठीशी प्रत्येक भारतीय ठामपणे उभा आहे. सीमेवर जवान अहोरात्र रक्षण करीत असल्यामुळेच सर्व भारतीय सुरक्षित आहेत. सेनेचे जवान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून त्यांचे योगदान कोणीच विसणार नाही. शहीद जवानांच्या कुटूंबाच्या दु:खात सांगलीकर सहभागी आहेत, अशी भावनाही प्रतिनिधींनी व्यक्त केली.या घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजकांनी उपस्थित रहावे. जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. व्यापारी, उद्योजकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.साडेदहा वाजता दोन मिनिटाचे मौनजिल्हा प्रशासनाच्यावतीने साडेदहा वाजता सांगली शहरात भोंगा वाजविणार आहे. भोंगा वाजताच सर्वच नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात यावी. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाºयांनीही भोंगा वाजताच दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSangliसांगली