शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंच निवडीत सरपंचांना मताचा अधिकार : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:47 IST

विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने दिला असल्याची माहिती अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना ...

विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने दिला असल्याची माहिती अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई व शिंदेवाडी (घोरपडी) येथील सरपंच आक्काताई भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिल्याचेही अ‍ॅड. मुळीक यावेळी म्हणाले.ते म्हणाले, महाराष्टÑ शासनाने ग्रामपंचायत कायद्यात दुरूस्ती करून सरपंचाची थेट निवड करण्याचा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशानुसार निवडून आलेला सरपंच पदसिध्द सदस्य असल्याने आणि उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल, अशी तरतूद होती.

या तरतुदीच्या अनुषंगाने उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसºया व निर्णायक मताचा वापर करता येईल किंवा कसे याबाबत शासनाकडे विविध ठिकाणांहून मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर शासनाने दि. १ नोव्हेंबररोजी उपसरपंच निवडणुकीच्या फेरीमध्ये सरपंचांना मतदानामध्ये भाग घेता येणार नाही. मात्र या फेरीतील उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असे कक्ष अधिकाºयांनी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कळविले होते. त्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले होते.

त्यामुळे शासनाच्या दि. १ नोव्हेंबरच्या परिपत्रकास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई व शिंदेवाडी (घोरपडी) येथील सरपंच आक्काताई भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवार, दि. १५ जून रोजी निर्णय देताना शासनाचे परिपत्रक रद्द करून सरपंचांना उपसरपंच निवडीत सदस्य म्हणून एक आणि समसमान मते मिळाल्यास निर्णायक एक मत देण्याचा अधिकार दिला असल्याचे अ‍ॅड. मुळीक यांनी सांगितले.

बाबासाहेब मुळीक यांनी सांगितले...खानापूर तालुक्यातील कमळापूर, बलवडी (खा.) मादळमुठी, मिरज तालुक्यातील वड्डी, जत तालुक्यातील बेळुंखी, रामपूर, देवनाळ, साळमळगेवाडी, रेवनाळ या ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीला याचिकेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच सांगलीच्या जिल्हाधिकाºयांकडे तासगाव तालुक्यातील पुणदी, वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष व काळमवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (हिंगणगाव) येथील उपसरपंच निवडीबाबतच्या याचिका प्रलंबित आहेत. या सर्व याचिकांवर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती अ‍ॅड. मुळीक यांनी दिली.

 

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय