त्यामुळे बहुतांश ठिकाणी निकालाचा कौल मान्य करून सरपंच, उपसरपंच निवडी झाल्या. संमिश्र निवडणूक झालेल्या गावांत सरपंचपद एका गटाला, तर उपसरपंचपद एका गटाला देण्याचा फॉर्म्युला राबविण्यात आला. आरक्षण जाहीर झालेल्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने कौलगे, वीजनगर आणि जुळेवाडी या ठिकाणी केवळ उपसरपंच निवडी करण्यात आल्या. त्यामुळे या तीन गावांचा कारभार उपसरपंचांच्या ताब्यात राहणार आहे. निवडी झालेले सरपंच, उपसरपंच पुढीलप्रमाणे वडगाव : रमेश पवार- सरपंच, सचिन पाटील - उपसरपंच. धुळगाव : सलमा बागणीकर - सरपंच, अभिजित डुंबल - उपसरपंच. नरसेवाडी : शर्मिला जाधव - सरपंच, कांचन जाधव - उपसरपंच. धामणी : पुष्पाताई मंडले - सरपंच, अशोक पाटील - उपसरपंच. पाडळी : वंदना कुलकर्णी - सरपंच, अजित पाटील - उपसरपंच. कौलगे : महादेव औताडे - उपसरपंच. सावळज : स्वाती पोळ-सरपंच, संज थोरात - उपसरपंच. कवठेएकंद : राजेंद्र शिरोटे- सरपंच. शर्मिला घाईल- उपसरपंच. सिद्धेवाडी : रंजना चव्हाण- सरपंच, राजेंद्र चव्हाण- उपसरपंच. दहिवडी : दिलीप भोसले- सरपंच, प्रमोद जाधव-उपसरपंच. मांजर्डे : संधराणी मंडले- सरपंच, मोहन पाटील-उपसरपंच. हातनूर : प्रकाश एडके-सरपंच, विठ्ठल पाटील- उपसरपंच. नागावकवठे : सुलतान मुलाणी-सरपंच, सुधीर पाटील-उपसरपंच. तुरची : विकास डावरे- सरपंच, संतोष पाटील-उपसरपंच. विसापूर : दिलीप माने- सरपंच, राजेंद्र भाट- उपसरपंच. ढवळी : आनंदा पाटील-सरपंच, कल्पना खुडे- उपसरपंच. शिरगाव : शत्रुघ्न पाटील- सरपंच, जश्री पाटील-उपसरपंच. राजापूर : शुभांगी गाडे- सरपंच, लक्ष्मण घळगे- उपसरपंच. पेड : तेजस्विनी शेंडगे- सरपंच, मनोहर शेंडगे- उपसरपंच. लोकरेवाडी -सुवर्णा पवार- सरपंच, सचिन वंजारी- उपसरपंच, गव्हाण : हणमंत पाटील- सरपंच, रावसाहेब सरवदे-उपसरपंच. डोंगरसोनी : राणी झांबरे- सरपंच, किशोर कोडग- उपसरपंच. आळते : आनंदा माळी- सरपंच, बालाजी मोहिते- उपसरपंच. वज्रचौंडे : संध्या पटील- सरपंच, धनाजी यादव- उपसरपंच, मोराळेपेड : बाजीराव पाटील-सरपंच, अश्विनी चोपडे- उपसरपंच, डोर्ली : रविंद्र सदाकळे- सरपंच, वैशाली पाटील- उपसरपंच. लोढे : विलास पाटील- सरपंच, सुहास कांबळे- उपसरपंच. धोंडेवाडी : महादेव जाधव- सरपंच, अर्चना जाधव- उपसरपंच. येेळावी : वनिता जाधव- सरपंच, रवींद्र सूर्यवंशी- उपसरपंच, जुळेवाडी : वीज खोत- उपसरपंच. गौरगाव : संगीता कोळी- सरपंच, प्रियांका खराडे- उपसरपंच. जरंडी : पितांबर शिंदे- सरपंच, सविता मोहिते- उपसरपंच. गोटेवाडी : कविता लेंगरे- सरपंच, मारुती ठोंबरे- उपसरपंच. बोरगाव : कासाबाई पाटील- सरपंच, माणिक हिवरे- उपसरपंच. निंबळक : गौसपाख देवर- सरपंच, शरद पाटील- उपसरपंच. वीजनगर : विक्रम पवार- उपसरपंच. यमगरवाडी : बळवंत यमगर- सरपंच, सुनीता गोरे- उपसरपंच. वाघापूर : कविता देसाई- सरपंच, सीताराम पाटील-उपसरपंच.
चौकट :
वज्रचौंडेत राष्ट्रवादीला अपक्षांचा धक्का :
वज्रचौंडे ग्रामपंचायतीत सात सदस्यांपैकी दोन सदस्य बिनविरोध झाले होते. पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन, तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. सातपैकी चार सदस्य राष्ट्रवादीचे होते. त्यामुळे राष्ट्रवादीचाच सरपंच होणार होता. मात्र राष्ट्रवादीत फूट पडली. त्यामुळे या ठिकाणी अपक्ष विजयी झालेल्या संध्या पाटीला सरपंच झाल्या.
चौकट :
धुळगाव, तुरचीत बहुमत एकाचे, सरपंच दुसऱ्या गटाचा :
धुळगाव आणि तुरची ग्रामपंचायतीत सत्तेत आलेल्या गटाकडे आरक्षण जाहीर झालेल्या प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने सरंपचपदाला मुकावे लागले. त्यामुळे अल्पमतात असूनही तुरचीत विकास डावरे यांना, तर धुळगावमध्ये सलमा बागणीकर यांना सरपंचपदाची संधी मिळाली.