शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संजयनगर पोलीस ठाण्यात भरली शाळा

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

कामकाजाची माहिती : पोलिसांचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

सांगली/संजयनगर : येथील संजयनगर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी शाळा भरविण्यात आली. पोलिसांचे काम, पोलिसांकडे असलेली हत्यारे, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी हा उपक्रम राबविला. त्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची असते. सामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात येण्यास भीती वाटू नये, शाळकरी मुले मोठी झाल्यानंतर निर्भयपणे त्यांनी पोलीस ठाण्यात यावे, ही अपेक्षा आहे. त्यांच्याव्यतिरिक्त पोलिसांच्या कामाचे स्वरूप मुलांना सर्वसाधारणपणे समजून यावे. पिस्तुल भरपूर वजनाचे असते. रायफल दिसताना चांगली दिसते, ती चालविण्यासाठी पोलिसांना कष्ट उचलावे लागतात, याचीही माहिती मुलांना मिळावी, यासाठी शनिवारी शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना एस. एल. आर. पिस्तुल, एनएमएन कारवाईला ३००३ रायफल, हेल्मेट, लाठी लॉकअप याबाबतची माहिती शांतिनिकेतन माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिली. यामध्ये शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक नारायण एकसिंगे, हवालदार संजय जाधव, सुरेश सूर्यवंशी, संजय कांबळे, मंगेश गुरव, एस. ई. चव्हाण, फौयाज बारगीर, राजेंद्र साखळकर, संजय खाडेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)