शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाकांनी केले सदाभाऊंचे सारथ्य-सांगलीत राजकीय चर्चा रंगली : कृषी राज्यमंत्र्यांच्या चेहºयावर हसू फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:51 IST

सांगली : हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त शनिवारी वाळवा येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले. एक खासदार दुरावले असले तरी,

सांगली : हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त शनिवारी वाळवा येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले. एक खासदार दुरावले असले तरी, जिल्ह्याचेच दुसरे खासदार मित्रत्वाच्या कक्षेत आल्याने सदाभाऊंना थोडा दिलासा मिळाला असेल, अशी चर्चाही उपस्थितांत रंगली होती.

हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमासाठी शनिवारी नागरिक, निमंत्रित राजकारणी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील लोकांची गर्दी झाली होती. वाहनांचीही दाटी झाली होती. इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनास आल्यानंतर त्याचठिकाणी सदाभाऊ खोत यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते वाहनातून खाली उतरलेच नाहीत. उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून संजयकाका पाटील तेथे आले. त्यांचे वाहन पुढे लावले होते म्हणून त्यांनी सदाभाऊंच्या वाहनात बसणे पसंत केले.

छायाचित्रकारांना मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास वाहन नसल्याने संजयकाकांनी त्यांनाही सदाभाऊंच्या वाहनात बसण्याची सूचना केली आणि स्वत: वाहनाचे सारथ्य केले. वाहनात गर्दी झाल्याने सदाभाऊ आणि संजयकाका यांच्यामध्ये गिअरच्या बाजूलाच वाहनचालकाला बसावे लागले.कसरत करत संजयकाकांनी सारथ्य केले. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मोटार आल्यानंतर सदाभाऊंचे सारथ्य संजयकाकांनी केल्याचे पाहून उपस्थित अनेकांना आश्चर्य वाटले. संजयकाकांनी सदाभाऊंना विश्रांती घेण्याचाही सल्ला दिला. त्यानंतर दोघेही सभास्थानी विराजमान झाले.वाळवा येथे शनिवारी हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमासाठी आलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले. त्यांनी वाहन चालू करताच सदाभाऊंच्या चेहºयावर हसू फुलले. उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये हा चर्चेचा विषय बनला होता.