शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाकांचा पापाचा घडा भरला; दंडुकशाही मोडीत काढू: विशाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:37 IST

तासगाव : आर. आर. आबा पाटील नाहीत म्हणून खासदार संजयकाका पाटलांच्या अंगात चांगलीच मस्ती चढली आहे. आपण काहीही करू ...

तासगाव : आर. आर. आबा पाटील नाहीत म्हणून खासदार संजयकाका पाटलांच्या अंगात चांगलीच मस्ती चढली आहे. आपण काहीही करू शकतो; अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या पापाचा घडा आता भरला असून, त्यांची दंडुकशाही मोडीत काढू. लोकसभा निवडणूक ही संधी आहे. आबा आणि वसंतदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांबरोबर तासगाव तालुक्यातूनही मताधिक्य मिळेल, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.ढवळी (ता. तासगाव) येथे तासगाव तालुक्यातील प्रचाराचा प्रारंभ करताना ते बोलत होते.विशाल पाटील म्हणाले की, खासदार पाटील यांना, घरातल्याच व्यक्तींना चांगली वागणूक देता येत नाही. मग त्यांच्याकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवायची. गेली पाच वर्षे त्यांनी सांगली जिल्ह्यातील जनतेवर अन्याय केला आहे. आता जनताच त्यांना घरी बसविणार आहे. तासगाव तालुक्यात खासदार पाटील यांची गुंडशाही वाढली आहे. त्यांनी आमदार सुमनताई पाटील यांना कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. तासगावभोवतीच्या जमिनी दंडुकशाहीने रेटून स्वत:च्या नावावर करुन घेतल्या आहेत.आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की, भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, ते परत सत्तेत येता कामा नयेत. विशाल पाटील महाआघाडीचे भक्कम उमेदवार आहेत. त्यांना जनतेची पसंती मिळत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, सुरेश पाटील, डी. के. पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, ताजुद्दीन तांबोळी, विजय पाटील, जोतिराम जाधव उपस्थित होते.यापुढे ‘आ रे’ला ‘का रे’!विशाल पाटील म्हणाले की, मी वसंतदादा आणि आर. आर. आबांच्या विचारांचा वारसदार आहे. जनतेसाठी अखेरपर्यंत लढत राहणार आहे. माझ्यावर वसंतदादांचे चांगले संस्कार आहेत. मी सरळ वागणारा आहे, पण कोणालाही घाबरणारा नाही. मी गुंडगिरी करणार नाही. गुर्मीत वागणार नाही. मात्र जर कोणी ‘आ रे’ करत असेल, तर त्याला ‘का रे’ म्हणायला मी समर्थ आहे.