शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका-घोरपडे गटाचे सूर विधानसभेच्या निमित्ताने जमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:10 IST

खा. संजयकाका पाटील आणि आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी चार महिने आधीच विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. खा. पाटील यांनी खासदारकीचा पैरा फेडण्याचे अभिवचन या कार्यक्रमात जनसाक्षीने दिले आहे.

ठळक मुद्देसमीकरणे बदलली : खासदार गटाने पैरा फेडण्याची अपेक्षा वाढली

अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : खा. संजयकाका पाटील आणि आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी चार महिने आधीच विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. खा. पाटील यांनी खासदारकीचा पैरा फेडण्याचे अभिवचन या कार्यक्रमात जनसाक्षीने दिले आहे. त्यामुळे खा. पाटील व घोरपडे यांचे कार्यकर्ते दोस्तीचे नवे गीत गाऊ लागले आहेत.

गेल्या पाच वर्षात खा. पाटील व घोरपडे यांच्यात राजकीय वितुष्ट आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत आ. पृथ्वीराज देशमुख यांनी हा वाद मिटवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारात दोघांचे मनोमीलन करून दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत घोरपडे यांनी खा. पाटील यांचे जोमाने काम केले. त्यानंतर शनिवारी खा. पाटील व आ. देशमुख यांचा नागरी सत्कार केला व संजयकाका पाटील लवकर मंत्री व्हावेत, ही इच्छाही व्यक्त केली. आता खा. पाटील यांनी पैरा फेडावा यासाठी घोरपडे गट आस लावून बसला आहे.

या कार्यक्रमात खा. पाटील यांनी सांगितले की, काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी माझ्यात व अजितराव यांच्यात बेबनाव निर्माण केला. परंतु पुढच्या काळात आपण अजितराव यांच्या पाठीशी राहून राजकीय पैरा फेडू. काका व सरकार यांचा हा राजकीय याराना परत एकदा जुळल्याचे चित्र आहे. आ. देशमुख, आ. सुरेश खाडे, मकरंद देशपांडे या भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींनी घोरपडे यांचे तोंडभरून कौतुक करीत व आगामी विधानसभा निवडणुकीत घोरपडे यांना पूर्ण ताकद देणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना रिचार्ज केले. आता खा. पाटील व घोरपडे यांच्या गटातील पहिल्या फळीतील नेतेमंडळी एकत्र बस-उठ करत असून, दोन्ही गटात जुळलेला राजकीय सूर ‘सुरेल’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तालुक्यात काका-सरकार यांच्या मनोमीलनाचे वारे वाहू लागले असून, या माध्यमातून विधानसभेसाठी घोरपडे यांनी शड्डू ठोकला आहे.काकांचे वजन वाढलेसंजयकाका पाटील यांच्या विजयाने तालुक्यात त्यांचे राजकीय वजन वाढले असून, कार्यकर्त्यांच्या बेरजेत वाढ झाली आहे. याचा राजकीय फायदा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अजितराव घोरपडे यांना व्हावा, अशी अपेक्षा घोरपडे गटातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली