शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख

By admin | Updated: March 21, 2017 13:24 IST

उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर यांचे अर्ज दाखल

आॅनलाईन लोकमतसांगली : शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर यांनी सोमवारी रात्री भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचा सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा मार्ग मोकळा झाला.अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांचा तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे सुहास बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सत्यजित देशमुख यांचा तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी तीन वाजता निवड होणार आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी ३५ संख्याबळ असल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी, अपेक्षित संख्याबळ गाठणार असल्याचे स्पष्ट केले होते. मंगळवारी सांगलीत दिवसभर वेगवान राजकीय हालचाली झाल्या. पतंगराव कदम यांच्या सांगलीतील निवासस्थानी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, विश्वजित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील आदी उपस्थित होते. सोमवारी रात्री उशिरा पुन्हा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही जयंत पाटील यांनी स्वतंत्रपणे जिल्हा बँकेत चर्चा केली. शिवसेना आमदार अनिल बाबर यांनाही दोन्ही काँग्रेस नेत्यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.दुसरीकडे भाजपची पोलिस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत सत्तास्थापनेसाठी करावयाच्या तडजोडींचे अधिकार संजयकाकांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर संजयकाकांनी शिवसेना, घोरपडे गटाशीही चर्चा केली. दोन्ही काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पदांचीही आॅफर दिली होती. भाजपला या गोष्टीची कल्पना आल्यानंतर त्यांनीही बाबर यांना चचेर्ला बोलाविले. चचेर्चे हे गुऱ्हाळ रात्री उशिरा संपले. महाबळेश्वर येथे सहलीवर गेलेले भाजपचे २0 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. अध्यक्ष निवडीपूर्वी ते कोल्हापुरातून सांगलीत येणार आहेत. (प्रतिनिधी)